अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनसामाजिक

श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने  ज्योतीताई गिते यांना श्री सिद्ध गणेश महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान.

Spread the love

श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने  ज्योतीताई गिते यांना श्री सिद्ध गणेश महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान.On behalf of Shri Ganesh Tarun Mandal, Shri Siddha Ganesh Female Entrepreneur Award was presented to Jyoti Tai Gite.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २२ सप्टेंबर.

श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक आयोजित श्री सिद्ध गणेश महिला उद्योजिका पुरस्कार यावर्षी  ज्योतीताई गजानन गिते यांना प्रदान करण्यात आला. श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी समाजातील विविध महिला उद्योजिका आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या यांचा गणेशोत्सव काळात सन्मान केला जातो.  ज्योतीताई गीते या सुमारे वीस-बावीस वर्षांपासून हॉटेल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. एक महिला या व्यवसायामध्ये आपल्या स्वकर्तुत्वाने उत्कृष्ट काम करत आहेत.

केदार मेढी गुरुजींनी श्रीमती ज्योतीताईंना मंत्रोच्चाराने शुभेच्छा दिल्या. हेमा मनीष खोल्लम यांनी शाल आणि मानपत्र दिले. सारिका अवधूत कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी ज्योतीताईंनी श्री गणेश तरुण मंडळाच्या या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि मंडळाच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या. ताईंचे दिर अविनाश गीते यांनी सुद्धा मंडळाच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  अवधूत कुलकर्णी अनिल कुंटे मिलिंद मेढी शितल वाघमारे ऋतुजा पुंडले भूपेन खोल्लम समृद्धी जोशी दिया निगडकर प्रशांत खर्डेकर श्रवण थिटे निशा राजे समीरा इनामदार पराग पुसाळकर शैलेश धर्माधिकारी आदी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.
मंडळाचे अध्यक्ष. अनिल फाकटकर व उत्सव प्रमुख स्वप्निल गुप्ते यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!