श्रीगणपती पाठोपाठ शंकर पार्वती (गौरीचे ) आगमनामुळे सर्वञ आनंदीआनंद.

श्रीगणपती पाठोपाठ शंकर पार्वती (गौरीचे ) आगमनामुळे सर्वञ आनंदीआनंद.Lord Ganapati is followed by Shankar Parvati (of Gauri) with great joy.
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २२ सप्टेंबर.
श्रीगणपती पाठोपाठ शंकर पार्वती (गौरीचे ) आगमनामुळे सर्वञ आनंदीआनंद पहायला मिळत आहे.
घरघुती गणपतीचे पाठोपाठ गौराईंचे गुरूवारी सोनियाचे पावलांनी आगमन झाले.त्यामुळे प्रत्येक घरी एकञ कुटूंब आहे, त्याठिकाणी गणपतींची सजावट आहे.त्या मखरामधे देखावा व गौराई आंणि शंकर महादेवही पाना फुलांचे रूपाने विराजमान झाले आहेत.
या ठिकाणी प्रत्येक घरी असे गौरीचे आगमनामुळे फराळाचे पाचपक्वान्ने तर असतातच, शिवाय बाजारातील मिठाई पुडे यांचेमुळे पाच दिवसांसाठी आलेल्या पाहुण्यांचे जोरदार आगतस्वागत पहायला मिळत आहे.उद्या गौरीगणपती विसर्जन आसल्याना आज बहुतेक लोकांनी घराबाहेर जावून गावातिल व नातेवाईकांच्या घरी जावून दर्शनाचा लाभ घेतला.
अनेक ठिकाणी चँंद्रयान ३, पर्यावरणपूरक असे देखावे, झाडेलावा, झाडे जगवा आसा संदेश देणारा देखावे तयार केल्याचे दिसते.येथील औंढोलीत एका गौरी गणपतीचे सजावट करताना चराचे कागदी ग्लासचा खुबीने वापर करून इकोफ्रेंडली सजावट काल्पनिक मयुरासन साकारले आहे.