अध्यात्मिकमावळ

शहर व ग्रामिण भागातील घरघुती गणपतीचे गौरीसह तलावात वाजतगाजत विसर्जन.

Spread the love

शहर व ग्रामिण भागातील घरघुती गणपतीचे गौरीसह तलावात वाजतगाजत विसर्जन.Immersion of household Ganesha in city and rural areas with Gauri in the pond.

आवाज न्यूज :: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २४ सप्टेंबर ‌.

शहर व ग्रामिण भागातील घरघुती गणपतीचे गौरीसह तलावात वाजतगाजत विसर्जन करण्यात आले.
पाच दिवसांच्या गणपतींचे गौरींसह औंढोली , औंढेखुर्द , देवले , पाटण , बोरज कार्ला , वेहेरगाव , दहिवली या गावाचे तलावामधे विसर्जन करण्यात आले.लोणावळा , कुसगाव बुद्रूक , भैरवनाथनगर , वळकाईवाडी ,डोंगरगाव , डोंगरगाववाडी , कुसगाववाडी येथील गणरायांचे गौरीसह ओढ्याचे पाण्यात व इंद्रायणीनदी मधे विसर्जन करण्यात आले.

औढोलीत गौरी, गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मारूती मंदिरात सर्व गणपती मुर्ती आणल्यानंतर येथे मानाच्या गणपतीसमोर सर्व गणपतींची आरती झाली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तरूणांनी , तरूणींनी यात सहभाग घेतला..भंडारा , गुलालाची उधळण करीतच विसर्जन मिरवणुक गणपती बाप्पा मोरया  पुढच्या वर्षी लवकर या  चा जयघोष करीतच मिरवणूक पाझर तलावाजवळ पोहोचली..येथेही तळ्याकाठी गणपतींची आरती झाली. ना ढोल ताशांचा गजर ना भजनाचा ताल, गणरायाला शांततेत निरोप देण्यात आला.

जिल्हापरिषद शाळेच्या बाजूला असलेले दहा पंधरा गणपती ट्रॕक्टर चे रथावर ठेवण्यात आले होते.फुगे आणि पानाफुलांची सजावट केलेली होती.गुलालाची उधळण ,व भंडारा याची उधळण यामधे हा कार्यक्रम झाला. तलावाचे पाण्यात गणपतींचे व गौराईंचे विसर्जन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुर्तीवरील पुष्पहार , निर्माल्याचे हार , फुले यांचे एका दोन पोत्यांमधे संकलन करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!