नगरपरिषदसामाजिक

महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधत स्वच्छता ही सेवा अंतर्गत सफाई मित्र शिबीर संपन्न..

मुख्याधिकारी यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना 'स्वच्छता ब्रँड' म्हणुन सन्मानित.

Spread the love

महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधत स्वच्छता ही सेवा अंतर्गत सफाई मित्र शिबीर संपन्न, मुख्याधिकारी यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता ब्रँड’ म्हणुन सन्मानित.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, अतिक्रमण प्रमुख विशाल मिंड, कर संकलन लिपिक प्रवीण माने, विशाल लोणारे, शहर समन्वयक गीतांजली होनमाने, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, अनिल इंगळे, भिवा पिचड, चंद्रकांत खंते आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

तसेच  महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा अंतर्गत सफाई मित्र शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीरातील सर्व सफाई मित्रांचे परीक्षण करण्यात आले. त्यानुसार मा. मुख्याधिकारी यांच्या हस्ते सफाई कर्मचारी दशरथ हरिभाऊ शेडगे आणि लता गायकवाड या दोन्ही सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता ब्रँड’ म्हणुन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!