मावळलोणावळासामाजिक

टायगर पाॕईंटला फिरायला गेलेल्या पर्यटकांचे क्रेटा कारला आपघात ;एक मृत्यूमुखी , तर एक गंभीर व तीन किरकोळ जखमी.

Spread the love

टायगर पाॕईंटला फिरायला गेलेल्या पर्यटकांचे क्रेटा कारला आपघात ;एक मृत्यूमुखी , तर एक गंभीर व तीन किरकोळ जखमी.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ४ ऑक्टोबर.

टायगर पाॕईंटला फिरायला गेलेल्या पर्यटकांचे क्रेटा कारला आपघात होऊन त्यामधे एक पर्यटकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. यामधे तर एक गंभीर व तीन जण किरकोळ जखमी झाले. कुञ्यासारखा प्राणी आडवा आल्याने व धुक्यामुळे आपघात झाल्याचे लोणावळा शहर पोलिंसांनी सांगितले.

पारूल सचिन सोनेकर (वय-२३,रा-येरवडा , पुणे,मूळगाव श्रीनिवास पुरी , साऊथ दिल्ली ) आसे मृताचे नाव आसून यामधे तीनजण गंभीर जृखमी झाले आहेत.
जखमी मधील ईश्वर चलवादी (वय-२४,रा-येरवडा ) यांना पवना हाॕस्पिटलमधे उपचारासाठी हलविले असून महिंद्र परदेशी , ऋषी परदेशी (वय-२४), यश परदेशी , (वय-२३) एकजण आत्यंत गंभीर जखमी असल्याने त्यास पवना हाॕस्पिटलमधे , तळेगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले असून दोघांना लोणावळ्याचे परमार रूग्णालयात दाखल केले आहे.

खबर देणार महिंद्र सतिश परदेशी (वय-२३,धंदा -व्यापार , रा-येरवडा ) यांनी खबर दिल्यावरून लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार.सूर्यवंशी यांनी आपघात दाखल करून घेतला. पोलिस हवालदार घोटकर यांनी मृताची तळेगाव येथे उत्तरीय तपासणी करून घेवून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

 

आपघाताचा सारांश असा : चालक पारूल सोनेकर व खबर देणार आसे पाचजण टायगर पाॕईंटला फिरायला ता.३ रोजी दुपारी गेले होते , चहा , व जेवण करून परत येताना एअरफोर्सचे जवळ प्रचंड धुके असल्याने क्रेटा कार क्रमांक एमएच१२पीएन ७६६० हीचेवरील चालक मयत पारूल सोनेकर याने आचानक समोरून कुञ्यासारखे जनावर आल्याने त्यास वाचवण्यासाठी कार डावीकडे घेतली. त्यामुळे कार खड्यात जोरात आदळून आम्ही सर्वजण जखमी झालो.
यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी आम्हाला कोणत्या तरी वाहनामधून परमार हाॕस्पिटलमधे दाखल केले. यावेळी गंभीर जखमी झाल्याने चालक पारूल सोनेकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डाॕक्टरांनी घोषित केले.एका जखमीस आतिशय गंभीर जखम आसल्याने तळेगाव येथे हलविले आहे. पुढील तपास पोलिसआधिकारी घोटेकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!