Puneराजकीय

अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्रीपदी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली यादी जाहीर..

Spread the love
अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्रीपदी..Ajit Pawar again as Guardian Minister of Pune..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली यादी जाहीर.. 

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी ४ ऑक्टोबर.

 

अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून मंत्रीमंडळ विस्तारावरुन नाराजीच सत्र पहायला मिळत होत. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार? असा पेच होता. अजित पवारांची नाराजी शेवटी फळाला आली आणि पुण्याचं पालतकमंत्रीपद पुन्हा दादांनी घेतलं.

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!