क्रीडा व मनोरंजनसामाजिक

कौठळी शाळेतील बालचमुसाठी महाभोंडला अंतर्गत विविध खेळांचे आयोजन.

भोंडल्या सारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होते----आरती गायकवाड..

Spread the love

कौठळी शाळेतील बालचमुसाठी महाभोंडला अंतर्गत विविध खेळांचे आयोजन.
भोंडल्या सारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होते—-आरती गायकवाड..

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २४ ऑक्टोबर.

दिनांक २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे भोंडला साजरा करण्यात आला.प्रथम आरती गायकवाड व इतर उपस्थित महिलांनी हत्ती च्या प्रतिकृती चे पूजन केले.आरती गायकवाड यांनी उपस्थितांना भोंडला या कार्यक्रमाचे महत्व,नवरात्र उत्सव व भोंडला याचा परस्पर संबंध सांगितला.

भोंडल्यावर आधारित गीते सादर केली.विद्यार्थ्यांनी टिपऱ्या खेळण्याचा आनंद लुटला.विद्यार्थ्यांनी डब्यात विविध खाऊ,पदार्थ बनवून आणले होते.आवाजावरून डब्ब्यातील खाऊ ओळखा हा खिरापत(खेळ) घेण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक महिला पालकांनी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षकांनी केले. स्वागत अमित भोंग यांनी केले तर आभार भारत ननवरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!