आंदोलननगरपरिषदमावळसामाजिक

आंदोलनकर्त्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव..

मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे.

Spread the love

आंदोलनकर्त्यांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव;  मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे.The water problem will be solved? After the written assurance of the chief executive, the hunger strike is over.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहराला होणारा पाणीपुरवठा अनियमित असून तो सुरळीत करावा तसेच अन्य नागरी सुविधांच्या मागणीसाठी फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली
गुरुवारी (दि.२) नगरपरिषद कार्यालयासमोर जाहीर उपोषण
करण्यात आले.

सकाळी १०.३०वाजता उपोषणास सुरुवात झाली. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम माजी नगरसेवक अरुण माने सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद,तळेगाव दाभाडे शहर भाजपचे अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी अध्यक्ष रवींद्र माने, माजी नगरसेवक दिलीप खळदे, गोपाळ परदेशी, शंकर भेगडे,सचिन भांडवलकर,शोभा परदेशी,विशाल पवार,दिलीप चौधरी,किरण साळवे,महेश कदम, बाळासाहेब शेडगे,नवनाथ कुल, आनंद घोडके, सुनील दाभाडे, निरंजन जहागीरदार, प्रेमनाथ परदेशी, आनंद घोडके, मयूर गरुड,उल्हास आगळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी एन . के.पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही.

करदात्यांना पाणी देता येत नसेल तर पाणीपट्टी माफ करा. अशोक दाभाडे भाजपा. शहराध्यक्ष.

पहिले तळेगाव शहराला पाणी पुरवठा करा व नंतरच नगरपरिषदेच्या हद्दीबाहेर असलेल्या नळकनेक्शनला पाणी पुरवठा करा तसे केले तरी ५०% पाण्याचा प्रश्न
सुटेल. दिलीप खळदे मा. नगरसेवक.

तळेगाव मधील सर्व हॉस्पिटलस् अनधिकृत. तसेच,१५ दिवसात नगर परिषदेतील कामकाजात सुधारणा झाली नाही तर नगरपरिषदेला टाळे ठोकणार व मनसे स्टाईल आंदोलन करणार ‌, सचिन भांडवलकर.

स्टेशनला लिकेजमुळे पाणी वाया जात आहे त्यावर नियंत्रण करा दिलीप डोळस.

अरुण माने, जयंत कदम, आणि अशोक दाभाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
नागरिकांनी समस्येचा पाढा वाचला. मूलभूत सुविधाही वेळेवर मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.आंदोलनकर्ते लेखी आश्वासनावर ठाम राहिले. अखेरीस मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी लेखी आश्वासन
दिल्यानंतर दुपारी १.१५ च्या सुमारास उपोषण मागे घेण्यात आले.मुख्याधिकारी पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब जांभुळकर यांनी पाणी प्राशन केले.दरम्यान, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पंधरा दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या मागण्यांसाठी केले होते उपोषण.

अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करून दररोज पाणी पुरवठा वेळेत व्हावा.ड्रेनेजपाईप लाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे रस्ते खड्डे युक्त झाले आहेत. संपूर्ण शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे.नुकताच पावसाळा झाल्यामुळे गवत व झुडपे वाढल्यामुळे गवत व झुडपे वाढल्यामुळे डेंगु सारखे मच्छर वाढवल्यामुळे रोगराई सुरू झाली आहे. त्यामुळे गवत व झुडपे काढुन फवारणी वेळोवेळी करावी. रस्ते, गटारे स्वच्छ असावेत. दररोज झाडलोट व्हावी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!