क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवडसामाजिक

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई. बोर्ड) विद्यालयाचे गायन स्पर्धेत यश.

Spread the love

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई. बोर्ड) विद्यालयाचे गायन स्पर्धेत यश.Success of Pratibha International School and Junior College (CBSE Board) Vidyalaya in Singing Competition.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी २ नोव्हेंबर.

चिंचवड येथील नामांकित कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई. बोर्ड) विद्यालय विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक विकासच नाहीतर संस्कार देखील रुजविले जातात. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रेरणेने व प्राचार्या सविता ट्रॅवीस य़ांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीटीप्राईड’ विद्यालयाने पर्यावरण रक्षणाविषयी जागृती करणारा ‘रिदम’ कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे संगीत / गायक शिक्षक अभिषेक थोरात व संगीत शिक्षक अथर्व शिंदे यांनी स्वत: तयार व संगीतबद्ध केलेले पर्यावरणाचे रक्षण करणारे गीत सादर करून विद्यालयाने तिसरा क्रमांक मिळविला तसेच, ‘जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ द्वारा आयोजित “आंतरशालेय भजन” स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी “विष्णुमय जग” हे भजन सादर करून उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेतले व या भजनास २ रा क्रमांक मिळाला. यासाठी विद्यालयातील संगीत शिक्षक अथर्व शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा व प्राचार्या सविता ट्रॅवीस व उपप्राचार्या लिजा सोजू यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!