देश विदेश

कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्ष ( 1924 2024 ) प्रित्यर्थ 100 रुपयांचे नाणे(100 Rs. Commemorative Coin ) यांचे भारतीय रिझर्व बँकेचे सन्मानीय गव्हर्नर  शक्तिकांता दास यांच्या शुभ हस्ते अनावरण.

Spread the love

कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्ष ( 1924 2024 ) प्रित्यर्थ 100 रुपयांचे नाणे(100 Rs. Commemorative Coin ) यांचे भारतीय रिझर्व बँकेचे सन्मानीय गव्हर्नर
 शक्तिकांता दास यांच्या शुभ हस्ते अनावरण..

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ३ नोव्हेंबर.

मुंबई दिनांक 1/11/2023 रोजी World Trade Centre येथे100 रु कॉइन चा अनावरण करण्यात आले.
लोणावळा येथे 1924 साली स्वामी कुवलयानंद जी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली होती.

कैवल्यधाम योग संस्था 2023-24 मध्ये आपले शताब्दी वर्ष साजरे करीत असून 2024 साली आपली
शतकपूर्ती करीत आहे. याचे औचित्य साधून कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्ष ( 1924-2024 ) प्रित्यर्थ
100 रुपयांचे नाणे ( 100 Rs. Coins ) यांचे अनावरण बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी World
Trade Center, South Lounge Ground Floor, मुंबई येथे सायंकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सन्मानीय अध्यक्ष  शक्तिकांता दास यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी कैवल्यधाम Advisory व Governing Body चे सभासद, संस्थेचा अधिकारी वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवरव्यक्ती तसेच मुंबई व लोणावळा शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकमाची सुरुवात शांतीपाठ आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिवप्रमुख कार्यकारी अधिकारी  सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे सन्मानीय गव्हर्नर  शक्तीकांत दास तसेच कैवल्यधाम शताब्दी वर्ष कमिटीचेअध्यक्ष व माजीं केंद्रीय रेल्वे मंत्री सन्मानीय  सुरेश प्रभू यांना शाल, पुष्पगुच्छ व स्वामी कुवलयानंद जीयांची मूर्ती देऊन सन्मानित केले. या प्रसंगी Journey of Kaivalyadhama Yogic Science: An Odyssey of 100 Years ” ( Documentary ) हा माहितीपट संक्षिप्त स्वरुपात दाखविण्यात आला.

कैवल्यधाम शताब्दी वर्ष कमिटीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सन्मानीय  सुरेश प्रभू
यांनी योगाचे महत्व आपल्या भाषणातून पटवून दिले.
कैवल्यधाम मुंबई शाखेचे संयुक्त संचालक ( Joint Director )  रवी दीक्षित यांनी संक्षिप्त स्वरूपात
अगदी सोप्या पद्धतीने उपस्थितांचा योगाभ्यास घेतला.
यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सन्मानीय गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम
संस्थेच्या शताब्दी वर्ष (1924-2024 ) प्रित्यर्थ 100 रुपयांची नाणे (100 Rs. Commemorative Coin )
यांचे अनावरण करण्यात आले. त्यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास आणि पुढील यशस्वी
वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 100 वर्ष पूर्ण करीत असलेल्या कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षाचे Coin चे
अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच लोणावळा येथील कैवल्यधाम संस्थेस भेट देण्याची इच्छा दर्शविली.याप्रसंगी उद्योगपती नानिक रूपाणी यांनी कैवल्यधाम संस्थेस देणगी दिली.
कैवल्यधाम योग संस्थेचे प्राध्यापक रणजीत सिंग भोगाल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कुमारी अन्विता दीक्षित यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!