पिंपरी चिंचवडसामाजिक

चिंचवड येथील श्रीकांत कदम यांना 2021-22 चा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान.

Spread the love

चिंचवड येथील श्रीकांत कदम यांना 2021-22 चा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान.Vishwakarma Gunwant Kamgar Award 2021-22 awarded to Shrikant Kadam from Chinchwad.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, प्रतिनिधी, २ नोव्हेंबर.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा दिला जाणारा मानाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार सन 202१- 22 चा दिला जाणारा पुरस्कार टाटा मोटर्सचे श्रीकांत बाबुराव कदम यांना देण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांनी पत्नी व कुटुंबियांसमवेत पुरस्कार मुंबई येथे स्वीकारला.

हा पुरस्कार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आठ तास नोकरी करून कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि कंपनीच्या उत्कर्षासाठी कंपनीच्या वाढीसाठी दिलेले योगदान पाहून आपल्या आस्थापनेच्या वाढीसाठी केलेले कार्य पाहून कंपनीमध्ये खर्चात केलेली बचत, उत्पादन वाढीसाठी सांघिक कार्य, फोकायोके, टी पी एम, वर्ड क्लास क्वालिटी यामध्ये दिलेले योगदान त्याचबरोबर सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये केलेले भरीव योगदान पाहून देण्यात येतो. त्यांनी महाराष्ट्राचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2021- 22 टाटा मोटर्स या कंपनीत योगदान पाहून देण्यात आला.

टाटा मोटर्स मध्ये कार्यरत असणारे श्रीकांत कदम यांना 1992 साली टाटा मोटर्स कंपनीत रुजू झाल्यापासून अनेक सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले. टाटाच्या कार्य संस्कृतीची आणि संस्काराचे बीज रोवल्यामुळे सामाजिक कार्यात भरीव योगदान देऊन मागील वीस वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी गावचे ग्रामस्थ असून मंदिरासाठी जमीन दान स्वरुपात दिली आहे, आधार समाजसेवा संस्थेमार्फत कोरोना काळात अनेक गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. चिंचवड प्रवासी संघाचे ते सल्लागार असून प्रवासीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करीत आहे. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने त्यांना गुणवंत कामगार देऊन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर सर्व सामाजिक क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!