क्रीडा व मनोरंजनसामाजिक

लोणावळा शहर मध्ये क्लॉकवर्ल्ड म्युझियमचा उदघाटन सोहळा संपन्न…

Spread the love

लोणावळा शहर मध्ये क्लॉकवल्ड म्युझियमचा उदघाटन सोहळा संपन्न…Inauguration ceremony of Clockworld Museum in Lonavala city…

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ७ नोव्हेंबर.

लोणावळा शहरात नव्याने झालेल्या आणी महाराष्ट्रातील प्रथमच असलेल्या संपूर्ण घड्याळांच्या संग्रहालयाचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. राजेंद्र चौहान यांच्या लोणावळा वैक्स म्यूसियमच्या प्रांगणात सदर उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक क्षेत्रातील नामांकित मंडळी सदर प्रसंगी उपस्थित होती. घड्याळविश्व संग्रहालयाचे उदघाटन  दादासाहेब उऱ्हे व अशोक काळोखे यांच्या शुभहस्ते झाले.

उदघाटन प्रसंगी दादासाहेब उऱ्हे म्हणाले, “ही घड्याळे दुर्मिळ झाली आहेत. अलीकडील काळात कुठेही ही पाहायला मिळत नाहीत. त्यांचे संग्रहालय करणे हा आगळावेगळा प्रयोग आहे. समाजाने यांस साथ द्यावी.”
श्री. अशोक काळोखे म्हणाले, “डॉ. प्रमोद बोराडे व डॉ. प्रिया बोराडे सातत्याने नवनवीन संग्रहालये निर्माण करित आहेत. ही चळवळ पुढील काळात भव्य रूप धारण करेल.”
श्री. राजेंद्र चौहान म्हणाले, “शिवशाही ऐतिहासिक शस्रास्र व वस्तू संग्रहालय लोणावळा येथे नव्याने सुरु झाले. पर्यटकांनी यास उदंड प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद घड्याळविश्व संग्रहालयास देखील मिळेल यात शंका नाही.”

डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, ” लोणावळा वैक्स म्यूसियमच्या प्रांगणात एकूण १० मनोरंजन व सहित शिक्षण अशा ऍक्टिव्हिटी आहेत. समाजाला इतिहास कळावा या हेतूने सुरु झालेले शिवशाही संग्रहालय ही नवचळवळ होती. एका छताखाली १० प्रकाराच्या गेम्स फक्त येथेच उपलब्ध असल्याने जरूर नव्याने सुरु झालेल्या या क्लॉकवर्ल्ड म्यूसीयमला सर्वांनी प्रतिसाद द्यावा.”
चौहान म्हणाले, “साधारणपणे २५० ऐतिहासिक घड्याळे येथे ठेवलेली असून सर्वांनी या नवनवीन संग्रहालयाना भेट द्यावी. हे फक्त मनोरंजन नसून समाजाला इतिहास माहिती करून देणारे केंद्र आहे”

सदर समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिया बोराडे यांनी केले, आभार प्रदर्शन  शीतल काकडे व  नितीन पाडळकर यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!