आंदोलनऔद्योगिकमावळ

जनरल मोटर्स कामगार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण ५५ वा दिवस.

कामगारांच्या साखळी उपोषणास विविध संघटनांचा पाठिंबा.

Spread the love

जनरल मोटर्स कामगार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषणाचा ५५ वा दिवस ; कामगारांच्या साखळी उपोषणास विविध संघटनांचा पाठिंबा.55th day of General Motors Workers Union’s indefinite chain hunger strike; The support of various organizations to the chain hunger strike of the workers.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर.

जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्या कडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जनरल मोटर्स कामगार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण दिवस ५५ वा.गेली ५५ दिवसां पासून जनरल मोटर्स कामगारांचे साखळी उपोषण सुरु असून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वासाठी तळेगाव दाभाडे या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या कामगारांच्या साखळी उपोषणास भेट देण्याकरता तसेच पाठिंबा देण्याकरता पुढील मान्यवर उपस्थित राहिले.

पवन इन्सान, महाराष्ट्र बचाव कामगार युनियन,
परमेश्वर जाधव, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष
दादासाहेब,अध्यक्ष, गायकवाड रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना व इतर पदाधिकारी.
काळूराम लांडे पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष,  सतीश टकले खेड तालुका उपाध्यक्ष,  स्वप्निल मेदनकर,  अण्णा गाढवे खेड तालुका संघटक, निलेश पाटील खेड तालुका सचिव,  श्रीकांत अंभोरे खेड तालुका संपर्कप्रमुख, ज्ञानदेव शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष एमआयडीसी विभाग,  सोपान मोरे,  गणेश चव्हाण शहराध्यक्ष इत्यादी मान्यवरांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या साखळी उपोषणास पाठिंबा दिला.

यावेळी उपस्थित आंदोलन कर्त्याशी संवाद साधत असताना
माननीय श्री दादासाहेब गायकवाड, संस्थापक अध्यक्ष रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना म्हणाले की जनरल मोटर्स कामगारांवरती महाराष्ट्र राज्य शासन व जनरल मोटर्स कंपनी व्यवस्थापन यांच्याकडून अन्याय होत असून शासन याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनरल मोटर्स कामगार संघटनेला रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचा पाठिंबा असून कामगारांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यामध्ये आम्ही सर्व संघटना पदाधिकारी आवश्यक त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करू भविष्यातील रस्त्यावरील लढाईमध्ये देखील आम्ही कामगार संघटनेच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन कामगारांच्या न्याय हक्कासाठी सर्व पातळीवरील लढा मध्ये सहभागी होऊ.

याचबरोबर माननीय  पवन इंसान महाराष्ट्र बचाव कामगार संघटना, व माननीय  परमेश्वर जाधव भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष म्हणाले की जनरल मोटर्स कामगारांचा लढा हा सर्व कामगार वर्गाच्या न्याय व हक्कासाठी सुरू आहे मोदी सरकार हा लढा चिरडून कामगारांच्या न्याय हक्कावरती गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे.मोदी सरकारने भाषण बाजी खूप केली परंतु कष्टकरी कामगारांचे जीवन मात्र नरक बनवले आहे बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि वाढतील लूट यामुळे जनता एवढी कधीच त्रस्त झाली नव्हती तेवढी या मोदी सरकारच्या काळामध्ये मागील दहा वर्षापासून त्रस्त झाली आहे.महाराष्ट्र राज्यांमधील भाजपा केंद्र सरकारने कामगारांच्या रोजगारावर हल्ला केला असून हा हल्ला आमच्या जगण्यावरचा हल्ला आहे. देशात सध्या 32 कोटी लोकसंख्येला बेरोजगारीचा सामना करावा लागत असताना जनरल मोटर्स कामगारांना बेरोजगार करून महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये आणखी एक हजार कामगारांची भर टाकली आहे.

अच्छे दिन आहेत असे म्हणत अच्छे दिनाचे गुणगान भ्रष्ट मोदी मीडिया २४ तास गळा फाडून करत आहे. महाराष्ट्र सरकार जनरल मोटर्स कामगारांना रोजगाराचा अधिकार देऊ शकत नसेल तर ते आहेत कशासाठी असा सवाल यावेळी माननीय  परमेश्वर जाधव यांनी उपस्थित केला

पवन इंसान मनाली की जगातील अनेक देशांमध्ये लोकांनी जे अधिकार मिळवले आहेत त्यांनी ते लढूनच मिळवले आहेत जनरल मोटर्स कामगारांना त्यांचा रोजगाराचा अधिकार देखील मिळवण्यासाठी लढा द्यावा लागत आहे तो अधिकार त्यांना लढूनच मिळणार असल्यामुळे आम्ही या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत. २०१२ ते २०१५ – या चार वर्षात पाच राष्ट्रीय पक्षांना देणगी स्वरूपात भांडवलदाराकडून ९९५६ कोटी ५७ लाख रुपये मिळाले, यापैकी सर्वाधिक ७४% म्हणजे ७०५ कोटी ८१ लाख रुपये एकट्या भाजपला मिळाले. एकट्या भाजपाला २०२१ /२२ वर्षात ६१५ कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट देणग्या मिळालेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुंडाई मोटर्स व जनरल मोटर्स व्यवस्थापकीय अधिकारी यांना भेटण्यासाठी वेळ देतात कारण ते कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक राज्यांमध्ये करत आहेत व जनरल मोटर्स कामगार संघटनेला भेटण्यासाठी हेच उपमुख्यमंत्री जाणीवपूर्वक वेळ देत नाहीत असे चित्र दिसत आहे याचाच अर्थ महाराष्ट्र राज्यातील सरकार हे कार्पोरेटच सरकार आहे असाच होतो असे मला वाटते. सरकार कार्पोरेट कडून पक्षाला देणगे मिळत असल्यामुळे कार्पोरेट ला भेटण्यासाठी वेळ देत परंतु कामगारांच्या समस्या जाणून घेत नाही कामगारांच्या न्याय हक्कासाठी सरकार पुढे येऊन सर्वसामान्य जनतेचे सरकार म्हणून कामगारांना मदत करत नाही हे स्पष्ट होते.

आंदोलन स्थळी भेट देऊन माननीय  दादासाहेब,अध्यक्ष, गायकवाड रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना व इतर पदाधिकारी वर्ग यांनी जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या अध्यक्ष  संदीप श्रीधर भेगडे, सचिव राजेंद्र पाटील, व खजिनदार  अमोल खाडे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!