क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

यशवंत नगर परिसरातील स्थानिक कलाकारांची स्वरमैफीलचे आयोजन ..

मा.नगरसेवक निखिल भगत आणि नागरिक मंच तळेगाव व यशवंत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यशवंत नगर येथे होणार संपन्न..

Spread the love

यशवंत नगर परिसरातील स्थानिक कलाकारांची स्वरमैफीलचे आयोजन ; मा.नगरसेवक निखिल भगत आणि नागरिक मंच तळेगाव व यशवंत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यशवंत नगर येथे होणार संपन्न..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ नोव्हेंबर.

माजी नगरसेवक निखिल उल्हासराव भगत  यांच्या वतीने आणि नागरिक मंच तळेगाव व यशवंत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यशवंत नगर परिसरातील स्थानिक कलाकारांची स्वरमैफिल आयोजित करण्यात आली आहे.

निखिल भगत म्हणाले, ” तिमिरातूनी तेजाकडे घेऊन जाणारा आणि निसर्गाच्या शुद्ध तत्वाची नाती सांगणारा उत्सव वाईटाचे अध:पतन करणारा व चांगल्याची कास धरणारा आहे. सूरांच्या साथीने दैनंदिन जगण्यातला अंधःकार दूर करण्यासाठी या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिपुर संध्या सुमधुर  स्वरांची मैफिल या कार्यक्रमात यशवंतनगर परिसरातील स्थानिक कलाकार सादरीकरण करणार आहेत. ही स्वर मैफिल रविवारी २६ रोजी सायंकाळी सहा वाजता गोळवलकर गुरुजी क्रीडांगण (गोल ग्राउंड), यशवंत नगर, तळेगाव स्टेशन येथे होणार आहे.नागरीकांनी या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणावर उपस्थित राहण्याची विनंती, निखिल भगत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!