आर्थिक/ बॅंकिंगमावळ

कडजाई माता पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील भोंगाडे तर उपाध्यक्षपदी दशरथ ढोरे यांची बिनविरोध निवड ..

Spread the love

कडजाई माता पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील भोंगाडे तर उपाध्यक्षपदी दशरथ ढोरे यांची बिनविरोध निवड. Sunil Bhongade as President of Kadjai Mata Credit Union and Dashrath Dhore elected as Vice President unopposed.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर.

इंदोरी येथील ग्रामदैवत श्री कडजाई माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुनील दशरथ भोंगाडे तर व्हाईस चेअरमनपदी दशरथ वामनराव ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी काम पाहिले.

सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये झालेल्या निवडी प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे,पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, पुणे पीपल्स को ऑप बँकेचे संचालक व सहकार भूषण बबनराव भेगडे, माजी सरपंच तुकाराम ढोरे,समीर जाधव,गणेश भोंगाडे, राहुल जाधव,भरत भोंगाडे,अर्जुन शेळके,शरद भोंगाडे,विदुर पचपिंड, अंबर तात्या दाभाडे,विजय जाधव तसेच इंदोरी,माळवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सुनील नाना भोंगाडे यांचे सर्व कार्यकर्ते शिवशक्ती सेवा मंडळ कार्यकर्ते माळवाडी बहुसंख्येने उपस्थित होते.

या आदी पतसंस्थेच्या संचालकपदी प्रियंका संतोष काशीद,मंदाकिनी नारायण पवार,रशीद भाई मुलानी, मनोहर भागवत,कामगार प्रतिनिधी सागर ढोरे,उद्योजक प्रतीक चव्हाण, चेतन चव्हाण,मुकुंदा केदारी,विक्रम बोत्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अध्यक्ष सुनील भोंगाडे व उपाध्यक्ष दशरथ ढोरे यांच्या निवडीनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माळवाडी  गावचे ज्येष्ठ बजरंग जाधव, गोरख दाभाडे, बबन आल्हाट ,अशोक दाभाडे, सुरेश शिंदे, रोहिदास म्हसे, बाळासाहेब दाभाडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!