आरोग्य व शिक्षणपिंपरी चिंचवडसामाजिक

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा ” ऋणानुबंध २०२३” माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.

Spread the love

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा ” ऋणानुबंध २०२३” माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.New Maharashtra Engineering “Loan Agreement 2023” Alumni Meeting Concluded.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ४ डिसेंबर.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ” ऋणानुबंध – २०२3″ माजी विद्यार्थी मेळावा आणि शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रवेशित नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला.

या मेळाव्यात २०१२ बॅच पासूनचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा ( संजय ) भेगडे, खजिनदार राजेश म्हस्के, प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन शंकरराव औताडे, मेम्बर सिनेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ संदीप रामदास पालवे, सी ई ओ एक्स्पर्ट आय टी डेटा इन्फॉर्मटिकसचे किरण मोरे, प्राचार्य डॉ. विलास देवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘’सातत्याने स्वतःला स्पर्धात्मक आणि गुणात्मक बनवा. विविध प्रशिक्षणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान शिका, तसेच विद्यार्थी दशेत असताना शिस्तीचे पालन करून चांगले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करा”, असे उद्गार शंकरराव औताडे यांनी बोलताना केले.

डॉ संदीप रामदास पालवे यांनी विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.
“अभ्यासक्रम आणि उद्योग जगतातील तंत्रज्ञान यातील अंतर हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच कमी करून प्रत्यक्ष औदयोगिक समूहासोबत काम करून, औदयोगिक भेटी दाव्यात. भविष्यात स्वतःला विकसित करण्यासाठी याचा उपयोग होईल” असे मत किरण मोरे यांनी मांडून तसेच इंटर्नशिप, स्टार्टअप आणि नोकरीच्या संधी या विषयांवर मार्गदर्शन केले.

‘नूतन संस्थेत माजी विद्यार्थ्यांसाठी उद्योजगता समन्वयाचे विविध उपक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती ही संस्थेची अभिमानाची बाब आहे. संस्था कायमच तुमच्या यशासाठी सहकार्य करेल, तुमचे कौतुक करेल’ अशी भावना राजेश म्हस्के यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली.
बाळा ( संजय ) भेगडे आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्रगती चा आढावा घेऊन माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले व महाविद्यालयाला एनबीए मानांकन प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य , सर्व विभागप्रमुख, रजिस्ट्रार , एनबीए कॉर्डीनेटर यांचा सत्कार केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी महाविद्यालयामधील विविध उपक्रमांची माहिती देऊन आगामी काळातील वाटचालीसाठी कल्पक योजना देखील मांडल्या. तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनेक मनोरंजक किस्से सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.महाविद्यालयाचे माजी विद्याथी आकाश शिंदे यांनी एमपीएससी युपीएससी या स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावेत असे आवाहन केले. तसेच गणेश मांदळे यांनीं नोकरी व व्यवसायाच्या संधी या विषयावर माहिती दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रथम विभाग प्रमुख डॉ शेखर राहणे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सत्यजित शिरसाट आणि प्रथम भोर, प्रयुक्ती दुबे या विद्यार्थ्यांनी केले. विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा सावकार, अथर्व मुटकुळे ,ऋतुजा पाटील, अथर्व जगताप, इशिका बंसल या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी समन्वयक प्रा शंकरराव उगले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!