क्राईम न्युज

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल – महाराष्ट्र पत्रकार संघाच्या मागणीला यश

Spread the love

कोकरूड वार्ताहर दि.03
कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील पत्रकार सूरज जगताप यांना वाळू तस्करांनी केलेल्या मारहाण प्रकरणी, हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ सांगली तर्फे तहसीलदार विशाल नरवाडे यांच्याकडे करण्यात आली होती .या मागणीची दखल घेत हल्लेखोरांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार हल्ल्याचा निषेध व्यक्त करून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीची दखल घेत अखेर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील पत्रकार सूरज जगताप यांनी येरळा नदीपात्रातून वाळू चोरी सुरु असल्याची माहिती तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिल्यानंतर वाळू तस्करांनी जगताप यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हल्लेखोरांवर कारवाही करण्याबाबत पोलिसांनी टाळाटाळ केली होती. याबाबत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ सांगली व शिराळा तालुक्याच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत अखेर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू तस्कर हणमंत किसन वाघमोडे(वय-35), जयपाल किसन वाघमोडे(वय-30), धैर्यशील बाबर(वय-30) यांच्या विरोधात चिंचणी- वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 452,324,327,427,504,506,34 नुसार महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम करीत आहे. पत्रकार संघटनेच्या लढ्यानंतर पोलिसांनी वरील कलमांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे, राज्य कार्यवाहक प्रतापराव शिंदे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष बिपीन पाटील, संघटक शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष बाजीराव घोडे,सदस्य संजय घोडे- पाटील, माजी तालुका अध्यक्ष प्रितम निकम, मनोजकुमार मस्के,सुरेश पवार, नवनाथ पाटील यांनी प्रयत्न केले.

कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील पत्रकार सूरज जगताप यांना वाळू तस्करांनी केलेल्या मारहाण प्रकरणी, हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी असे निवेदन महाराष्ट्र पत्रकार संघ सांगली तर्फे तहसीलदार विशाल नरवाडे यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यवाहक प्रतापराव शिंदे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष बिपीन पाटील, संघटक शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष बाजीराव घोडे,सदस्य संजय घोडे- पाटील, माजी तालुका अध्यक्ष प्रितम निकम, मनोजकुमार मस्के,सुरेश पवार, नवनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!