ग्रामीणमावळराजकीय

वाकसई ,देवघर ग्रूपग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत चार वार्डामधून ८६.२५%मतदान.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामिणचे पोलिस अधिकारी किशोर धुमाळ यांचे नेतृत्वाखाली पोलिसांकडून चोख बदोबस्त

Spread the love

वाकसई , देवघर ग्रूपग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत चार वार्डामधून ८६.२५%मतदान झाले.Vakasai, Deoghar Group Gram Panchayat quinquennium polls saw 86.25% voter turnout from four wards.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २० डिसेंबर.

वाकसई, देवघर ग्रूपग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत
चार वार्डामधून ८६.२५%मतदान झाले. सुमारे साडेसात वाजता सुरू झालेले मतदान मतदारांनी साडेपाचपर्यत दिवसभर मतदारांनी उत्साहात मतदान केले.
मतदारांना ने आण यासाठी वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत होता.

जिल्हापरिषद शाळा वाकसई येथील वार्ड क्रमांक एक मधे ८७%मतदारांनी हक्क बजावला. वार्ड क्रमांक दोनमधे ८४%मतदारांनी हक्क बजावला.देवघर शाळेतील वार्ड क्रमांक ३ मधे ८६% मतदारांनी हक्क बजावला.;तर करंडोली व जेवरेवाडी या गावात वार्ड क्रमांक ४ मधे ८८%मतदारांनी हक्क बजावला.

सरपंच पदासाठी तीन महिला उमेदवार रिंगणात असून त्यांचे सह चारही वार्डामधील उमेदवारांमधे चुरस पहायला मिळाली.तसेच खेळीमेळीत मतदान झाले.
वार्ड क्रमांक चार मधे तीन जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात असून सर्वसाधारण पुरूष, ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला जागेसाठी येथे मतदान झाले. शेलार, केदारी, देशमुख,  कौदरे या उमेदवारांचे व सरपंच पदाच्या येवले, जगताप आणि देशमुख यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

वार्ड ३ मधे आहेर मडके आणि देशमुख या चार उमेदवारांमधे लढत झाली.तर महिला जागेसाठी आहेर, ढाकोळ, देशमुख, येवले, रोकडे असे सात महिला उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.वार्ड क्रमांक १ मधे इंगूळकर , देसाई , विकारी , ढाकोळ आदी चार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.वार्ड क्रमांक २ मधे येवले , शिंदे , येवले , विकारी आणि काशिकर आदी उमेदवांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामिणचे पोलिस अधिकारी किशोर धुमाळ यांचे नेतृत्वाखाली चार पाच अधिकारी व साठ ते सत्तर पोलिसांकडून चोख बदोबस्त ठेवण्यात आला होता..वार्ड क्रमांक तीन बाहेर सरपंचपदाचे उमेदवारांनी उभे राहून मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
वार्ड क्रमांक एक व दोन मधे सकाळी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. येथे व्हिलचेआरवर आलेल्या सुमावे नव्वद वर्षाचे आजीनी मतदान केंद्रात जावून मतदान केले.
मतदान केंद्र क्रमांक तीन देवघर येथे दुपारी साडेतीन नंतर साडेपाच वाजेपर्यंत मशीन संथ गतीने चालू असल्यामुळे मतदारांची रांग पहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!