मावळराजकीयलोणावळा

वाकसई देवघर ग्रूपग्रामपंचायतचे सरपंचपदी माजी सरपंच सोनाली जगताप यांची बाजी.

नवीन उमेदवारांनी दिली जोरदार लढत ..

Spread the love

वाकसई देवघर ग्रूपग्रामपंचायतचे सरपंचपदी माजी सरपंच सोनाली जगताप यांची बाजी ; नवीन उमेदवारांनी दिली जोरदार लढत ..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २३ डिसेंबर.

वाकसई देवघर ग्रूपग्रामपंचायतचे सरपंचपदी माजी सरपंच सोनाली मनोज जगताप यांचेकडे दुसऱ्यांना ग्रामपंचायतचा कारभार मतदारांनी दिला. नवीन उमेदवारांनी जोरदार लढत दिली.

नगरपरिषद निवाडणुकीत दिसते ; तसेच चिञ या संवेदनशील ग्रामपंचायतीचे निवडणुकीत दिसून आले. मिनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम पहायला मिळाली. मॕनपाॕवर , मनीपाॕवर याचा जोरात वापर झाला ; माञ निवडणूक निर्णय आधिकारी यांचेकडून कोणतीही ठोस आचारसंहीता लागू न केल्याने लाखोंची बात कोटीपर्यत गेल्याची नागरिकांची चर्चा ऐकायला मिळाली.
सोनाली मनोज जगताप यांना मिळालेली मते १४९२, प्रतिस्पर्धी उमेदवार सविता जयवंत येवले यांना मते १०६०; तर नम्रता हरिविजय देशमुख यांना मते २८७ मिळाली व त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या.

या अत्यंत चुरशीच्या लढतीमधे सरपंचपदाच्या उमेदवार  सोनाली जगताप या ४३२ मतांनी विजयी झाल्या.
वार्ड क्रमांक एक मधून विजयी उमेदवार व इतर उमेदवार यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे. भारत मुकुंद देसाई यांना मते ४१६ मिळाली ते विजयी झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार
प्रतिक सुरेश देसाई यांना मते ३०१ मिळाली. नोटा ११ मते पडली.

महिला उमेदवार सोनाली लहू इंगूळकर यांना मते २९९ मिळाली व त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी उमेदवार
वर्षा अशोक ढाकोळ यांना मते २२४ मिळाली.स्वाती तुषार विकारी यांना मते २०० मिळाली.नोटा मते ०५ पडली.
वार्ड क्रमांक २ मधे शाम खंडू विकारी मते ४३८ मिळून ते विजयी झाले.प्रदिप धोंडू येवले यांना मते २८४ मिळाली.
याच वार्डात मारूती भरत येवले मते ५०२ मिळाली व ते विजयी झाले.रमेश गबळाजी येवले यांना २१९ मते मिळाली.नोटा ला २मते पडली.
माजी सरपंच दिपक काशिकर यांच्या पत्नी जयश्री दिपक काशिकर यांना मते ४७५ मिळून त्या विजयी झाल्या. यांनी जागा कायम राखली.

मुक्ताबाई लहू शिंदे मते २४४ मिळाली. नोटा ला ४मते मिळाली.
वार्ड क्रमांक ३मधे देवघर येथे गणेश यशवंत आहेर मते २९७ मिळाली व ते विजयी झाले.
प्रतिस्पर्धी उमेदवार हनुमंत दगडू आहेर यांना मते २५७ मिळाली. चंद्रकांत सखाराम मडके यांना मते १९० मिळाली.नोटाला ९ मते मिळाली.
सात महिला उमेदवारांमधून दोन जागांसाठी लढत झाली.यामधे मंगल बाबाजी ढाकोळ यांना मते ३०३ मिळून त्या विजयी झाल्या. या वार्डात आणखी एका महिला सदस्य जागेवर वर्षा प्रमोद येवले यांना मते २८८ मिळून त्या विजयी झाल्या.

प्रतिस्पर्धी उमेदवारांना सिमा बाळू आहेर मते १५२मिळाली.,अनिता संतोष देशमुख मते १९३ मिळाली.
बेबीताई अशोक देशमुख यांना मते १५५ मिळाली.
वनिता खंडू येवले मते २४८ मिळाली, काजल चेतन रोकडे मते २४५ मिळाली;तर नोटाला १२ आणि १२ अशी चोवीस मते पडली.

करंडोली , जेवरेवाडी वार्ड क्रमांक ४मधे सुरेश धोंडू केदारी मते ४०३ मिळून विजयी झाले. प्रतिस्पर्धी उमेदवार खंडू रामचंद्र शेलार यांना मते २८६ मिळाली.नोटा ला ६मते पडली.
महिला उमेदवारांमधे जयश्री गणेश देशमुख यांना मते ३७१ मिळून त्या विजयी झाल्या.
प्रतिस्पर्धी उमेदवार मोहिनी सदाशिव देशमुख यांना मते ३१५ मिळाली .नोटाला ला ९ मते पडली.
महिला उमेदवारांमधे रूपाली सूर्यकांत शेलार यांना मते ३५६ मिळून त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी उमेदवार उर्मिला आशोक कौदरे यांना मते ३२९ मिळाली.नोटाला १० मते पडली.विजयी उमेदवारांची श्री पोटोबा महाराज मंदिरात व गावातील मंदिरात भंडारा उधळून पुष्पहार घालून त्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!