अध्यात्मिकमावळ

७२० वर्षाची, परंपरेनुसार परिक्रमा ( आळंदी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा) आपल्या तळेगावात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे होणार पदार्पण..

रविवार दिनांक ३१/१२/२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता विठ्ठल मंदिर येथे पायी सोमाटणे मार्ग तळ्याकाठाने परंपरेनुसार मुक्कामी येणार आहे.

Spread the love

७२० वर्षाची, परंपरेनुसार परिक्रमा ( आळंदी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा) आपल्या तळेगावात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे होणार पदार्पण..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ डिसेंबर.

ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। एका जनार्दनी पाय वंदितसे ।।इंद्र येवोनि भूमिसी याग केले अहर्निशी। इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी त्या पासोनि ।।

संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेते वेळी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा उपस्थित होते त्यांच्या सोबत नामदेवरायादी समकालीन सर्व संतउपस्थित होते. त्यानंतर सर्व संतांनी आळंदी पंचक्रोशी यात्रा केली. त्यामध्ये तळेगांव येथे. ही यात्रा ज्ञानोबारायांच्या समाधीनंतर परंपरेने सुरू होती त्यावेळेपासून पालखी सोहळ्याचे जनक श्रीगुरु हैबतबाबा आरफळकर हे इ.स. १८३४ पासून वैकुंठवासी  ही यात्रा करत होते. नंतर नेलेंकन१९३६ पर्यंत करत होते ते आपल्या विठ्ठल मंदिरात मुक्कामास राहत असत यात्रेला ह्यावर्षी ७२० वर्षे झाली. ही परिक्रमा आपल्या गावात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन रविवार दिनांक ३१/१२/२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता विठ्ठल मंदिर येथे पायी सोमाटणे मार्ग तळ्याकाठाने परंपरेनुसार मुक्कामी येत असून सोमवार दि. १/१/२०२४ रोजी सकाळी ६ वाजता कुरकुंडी, ता. खेड येथे प्रस्थान होईल. अशी माहिती ह.भ.प.ज्ञानेश्वर ( माउली ) दाभाडे यांनी आवाज न्यूज प्रतिनिधीना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!