ग्रामीणमावळसामाजिक

देवलेतील श्रीभैरवनाथ मंदिरापासून भाजेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेचखड्डे..

पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय.

Spread the love

देवलेतील श्रीभैरवनाथ मंदिरापासून भाजेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेचखड्डे ; पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय.Potholes on the road leading from Shri Bhairavanath temple in Deole to Bhajegaon; Inconvenience of citizens due to water accumulation.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १४ जानेवारी.

देवलेतील श्रीभैरवनाथ मंदिरापासून भाजेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेचखड्डे, पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.देवलेतील काही भागात चालण्यायोग्य रस्ताच नाही. पाणी साचल्याने नागरिकांना खड्डेचखड्डे असलेल्या रस्त्याने रोज जा ये करावी लागते.

देवलेतील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिरापासून भाजेगावाकडे जाणाऱ्या पायवाटेने शाळांमधे जाणारे असंख्य विद्यार्थी पायी जातात. या मार्गावर ठिकठिकाणी नळाचे पाणी, सांडपाणी रस्त्याचे वर खड्डेच खड्डे पडल्याने त्यात साचते.या पाण्यातून वाट काढताना मोटारसायकलवर जाणाऱ्या येणाऱ्या तसेच पायी जा ये करणाऱ्यांची पाणी,  अंगावर उडून कपडे खराब होतात. या अरूंद रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, किंवा काँक्रीटीकरण केल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही.

या रस्त्याबाबत येथील स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली असता, सदरचा अरूंद रस्ता, पायवाट खाजगी मालकीची असल्याने येथून रस्त्याचे कामात अडचणी येत असल्याचे आवाज प्रतिनिधीशी बोलताना काही नागरिकांकडून माहिती मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!