क्राईम न्युज

सांगलीतील अट्टल गुन्हेगार नवनाथ लवटेचा खून पूर्ववैमनस्यातून; संशयित पोलिसांच्या ताब्यात.

Spread the love

नेर्ले ( ता.वाळवा)
सविस्तर असे की , संशयित हल्लेखोर गुंड (योगेश दिलीप शिंदे वय.25 रा. लक्ष्मी मंदिराजवळ सांगली ) पोलिसांच्या ताब्यात, शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2018 मध्ये त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन खुनात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
सदरच्या स्टेटसची मात्र चर्चा रंगू लागली होती. मृत नवनाथने त्याच्या व्हाट्सअप स्टेटस वर “मोका तर मोका..सून 302” असा मजकूर नमूद केला होता. लवकरच खून करणार, असा संदेश देणाऱ्या नवनाथचाच गेम झाल्याची चर्चा होती. सांगलीतल्या कॉलेज कॉर्नर परिसरात रेकॉर्डवरील (आरोपी नवनाथ दिलीप लवटे वय.30 रा. शिवशंभो चौक) याचा गुप्तीने भोसकून निर्घुण खून करण्यात आला.  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दडगे गर्ल हायस्कुल शेजारी सदरची घटना घडली.
मयत नवनाथ लवटे हा खंडणीतील संशयित आरोपी आहे. काही महिन्यापूर्वी सांगली बाजार समितीचे संचालक बाळू बंडगर यांना आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून दहा लाखाची खंडणी मागितली होती. त्यामध्ये नवनाथ लवटे हा संशयित आरोपी होता. त्याच्यासह अन्य सहा जणांविरोधात दोन महिन्यापूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तो जामिनावर बाहेर आला होता. संशयित योगेश आणि त्यांच्यामध्ये कोणत्या विषयावरून वाद होता हे अद्याप समोर आलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!