मावळसामाजिक

कार्लाचे श्रीएकविरा गडावर स्वच्छतेबाबत आभियानात काही टन कचरा जमा करण्यात आला.

Spread the love

कार्लाचे श्रीएकविरा गडावर स्वच्छतेबाबत आभियानात काही टन कचरा जमा करण्यात आला.A few tonnes of garbage were deposited in Karla’s Sri Ekvira Fort during a cleanliness drive.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २३ जानेवारी.

अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा दिवसांचा. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांच्या पुढाकाराने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई एकवीरा देवी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन देवीच्या मुख्य गाभारा व पुजास्थान स्वच्छ करून देवीची मनोभावे पुजा करण्यात आली तसेच देवीचा कळस संपु्र्ण पणे पाण्याने धुवून स्वच्छ करून अत्तर व गुलाब पाण्याने शुद्धी करण करण्यात आले परिसराची साफसफाई करून स्वच्छता करण्यात आली.

या वेळी माझी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरदभाऊ बुट्टेपाटील मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे भाजपा तालुका अध्यक्ष दत्तभाऊ गुंड, प्रांतीक सदस्य जितेंद्र बोत्रे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पुनम चौधरी, लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय रौदळ, लोकसभा समन्वयक कविता हिंगे,  मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम कदम, लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, एकवीरा देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त नवनाथ देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, तालुका उपाध्यक्ष मधुकर पडवळ, जिल्हा सरचिटणीस सविता गावडे, तालुका सरचिटणीस अभिमन्यु शिंदे सचिन येवले, दत्तात्रय पडवळ, मंगेश देशमुख अमोल भेगडे, किसन येवले, गणेश देशमुख, एकनाथ पोटफोडे, सदाशिव देशमुख, मच्छिंद्र केदारी, अरूण भानुसघरे यांच्या सह इतर सहकारी उपस्थित होते. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.

आपली श्रद्धास्थाने म्हणजे मठ, मंदिरे, तीर्थक्षेत्र हे आपले मानबिंदू आहेत. आपण आपल्या मनाच्या शुद्धीसाठी देव दर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताची देखील तितकीच पवित्र आहे. यामुळे माननीय मोदीजींनी याचेच महत्त्व ओळखून प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या अनुषंगाने मंदिर परिसर स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा सांप्रदायचे असाल ; तरी देखील आपल्या पुजास्थळी जाऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे आयोजन, सायलीताई जितेंद्र बोत्रे,
अध्यक्षा भाजप महिला मोर्चा मावळ,कार्याध्यक्ष सुमिञाताई जाधव, सरचिटणीस कल्याणी ठाकर, सरचिटणीस वैशाली ढोरे, सरचिटणीस स्वाती पारीठे व महिला मोर्चा मावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!