क्राईम न्युज
बिळाशी येथे वेडाच्या भरात गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या.
शिराळा /प्रतिनिधी
बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिळाशी येथील 27 वर्षीय तरुणीने घरातील लाकडी तुळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबाबतची वर्दी पोलीस नाईक एम एस पांढरे यांनी कोकरूड पोलिसात दिली आहे. याबाबत कोकरूड पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की बिळाशी येतील मधुमालिनी विश्वासराव पाटील या 27 वर्षीय तरुणीने वेडाच्या भरात आज बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील लाकडी तूळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक बी.डी. पवार हे करीत आहेत.