कृषीवार्ता

आले उत्पादकांची लूट थांबवावी या मागणीसाठी मंगळवारी पुणे बाजार समितीवर स्वाभिमानीच्या वतीने धडक

Spread the love

सांगली प्रतिनिधी
आले उत्पादकांची लूट थांबवावी या मागणीसाठी मंगळवारी पुणे बाजार समितीवर स्वाभिमानीच्या वतीने धडक मारण्यात आली आले पिकाची चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली खरेदी विक्री बंद पाडली दोन टन आले जप्त करण्यात आले. आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबली नाही तर व्यापाऱ्यांना बदडून काडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
सदर आंदोलन कडेगाव व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची लूट सुरू आहे ती थांबवावी या मागणीसाठी करण्यात आले आदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे व राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केले आले या पिकाची खरेदी ही सरसकट केली जायचे कोणतीही प्रतवारी न करता सौदे केले जायचे मात्र अलीकडच्या काही काळात जुने व नवे आले अशी प्रतवारी केल्याशिवाय सौदे केले जावू लागले होते यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ लागले बरेच उत्पादन टाकून द्यावे लागू लागले अशी शेतकऱ्याची तक्रार होती याबाबत सातारा येथे व्यापारी व शेतकऱ्याची संयुक्त बैठक पार पडली होती त्यात सरसकट सौदे करण्याचे ठरले होते तरीही पुणे बाजार समिती मध्ये काही व्यापारी प्रतवारी करूनच सौदे करत होते त्यामुळे सदर सौदे बंद पाडले प्रतवारी केलेला दोन टन आले पीक जप्त केले बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना बोलावून सर्व प्रकार सागून पुन्हा असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे सगण्यात आले त्यांनीही चुकीचे वागणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच व्यापाऱ्यांनी ही चूक कबूल करून पुन्हा असे घडणार नाही अशी ग्वाही दिली खराडे म्हणाले पुन्हा असा प्रकार घडला तर खपवून घेणार नाही त्यासाठी गस्त पथक ही तयार केले असून चुकीचे वागणाऱ्या व्यापाऱ्यांना बदडून कादु असा इशारा त्यांनी दिला यावेळी विभागीय अध्यक्ष प्रकाश बालवडकर अमर कदम दत्ताभाऊ घारगे तानाजी देशमुख अजित हलिगलें संदीप शीरोते किशोर कदम दत्ता भोसले आदीसह शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!