क्राईम न्युजमावळ

२० वर्षीय तरुणाच्या हत्येने तळेगावसह मावळ पुन्हा एकदा हादरला..

Spread the love

तळेगाव दाभाडे: २० वर्षीय तरुणाच्या हत्येने तळेगावसह मावळ पुन्हा एकदा हादरला.Talegaon Dabhade: The killing of a 20-year-old youth shook Talegaon and Maval once again.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ६ नोव्हेंबर.

किरकोळ  वादातून चार जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी दि. ५ रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास निलया सोसायटी समोर तळेगाव दाभाडे येथे घडली.

कृष्णा शेळके रा. तळेगाव दाभाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेळके हा त्याच्या दोन मित्रांसोबत निलया सोसायटी समोर थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या अनोळखी चार जणांनी कृष्णा याला इथे का थांबलास असे विचारले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. आरोपींनी कृष्णाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला पवना हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपींचा शोध सुरू असून, तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!