कृषीवार्ता

ग्रीन फाऊंडेशन चे २९ जिल्हात वृक्ष संवर्धन मोहीम कार्य सुरू- अमित जगताप

Spread the love

ग्रीन फाऊंडेशन २०१५ पासून निसर्ग व जनकल्याणाचे काम करणारी संस्था आहे. पर्यावरणाची होत आसलेली हानी लक्षात घेता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ग्रीन फाऊंडेशनने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम हाती घेतले.

पाण्याचा तुटवडा किंवा ग्लोबल वॉर्मिंग या मानवनिर्मित संकटापासून निसर्ग व समाजाला वाचवायचे असल्यास वसुंधरेला हरितक्रांतीनी सजवणे, फुलवणे हा मोलाचा विचार घेऊन ग्रीन फाउंडेशन गेली ७ वर्षे सातत्याने कार्य करत आहे. पर्यावरण जोपासना, नेतृत्वगुण, समाजबांधणी, हे गुण अंगी बाळगणारे श्री.अमित जगताप – ग्रीन फाउंडेशनच्या संस्थापक/अध्यक्षपदाची जबाबदारी परखडपणे पार पडत आहेत. महाराष्ट्रातील पुण्याजवळील लोणी काळभोर या ञग्रामीण भागात अवघ्या १० ते १५ सभासदांना घेऊन अमित जगताप यांनी सुरू केलेली ग्रीन फाऊंडेशन ही संस्था आज सुमारे महाराष्ट्रातील २९ जिल्हात पोहोचली आहे .

ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये दरवर्षी दुष्काळाचे सावट असते. ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन प्रत्येक गावात ५०० ते १००० च्या पुढे वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात येत आहेत

पर्यावरण संरक्षण समस्येबाबत समाज जागृत असला तरी सामाजिक घटकांत जाऊन त्या कार्याला चालना देण्याचे काम ग्रीन फाऊंडेशननी केले. हे काम करताना शासकीय दवाखान्यांची मदत घेत नवजात बालकाला व मातेला रोप वाटण्याचे काम ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष व सदस्यांनी केले, व नवजात बालकाची नाळ वसुंधरा मातेशी जोडली गेली पाहिजे या अनुशंगाने उपक्रम राबविण्यात येत आहेत, निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर फक्त वृक्षरोपण करून चालणार नाही तर वृक्षसंवर्धन देखील तेवढेच गरजेचे आहे हे लक्षात घेऊन नव्याने लावलेल्या व आधीपासून असलेल्या झाडाचे वृक्ष संवर्धनाचे काम केले. याबरोबरच ग्रीन फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्यांनी झाडांची संगोपन करण्याची जबाबदारी घेतली व या कार्याला हातभार लावला.

समाजाचे प्रबोधन करताना फक्त निसर्ग नव्हे तर माणसांचे सक्षमीकरण करणे देखील गरजेचे आहे. यासाठीच शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप तसेच शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षण व आत्मबल जागरुकतेचे धङे ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येत असतात. याच बरोबर रक्तदान, स्वच्छता अभियान ही कार्ये देखील ग्रीन फाऊंडेशन उत्तमरित्या पार पाडत आहे.

ग्रीन फाऊंडेशन ला ४५ पुरस्कार तसेच वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. ग्रीन फाऊंडेशनची हरित चळवळ काही वर्षांत संपूर्ण भारतात होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!