आरोग्य व शिक्षण

कै. ना. अ. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय मध्ये मतदान दिन संपन्न

Spread the love

चांदूर बाजार : कै. ना. अ. देशमुख महा. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कोविड -१९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार व विद्यापीठाने दिलेल्या आदेशानुसार मतदार दिन मोठ्या उत्सहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वनिता चोरे ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक तथा वक्ते म्हणून कॅप्टन डॉ. सुनील इंगळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
भारतीय नागरिकांना वयाच्या १८ व्या वर्षानंतर मतदानाचा अधिकार घटनेने दिलेल्या आहे . त्यामुळे विद्यार्थ्यानि आपली नाव नोदणी केली नसेल तर ते ताबडतोब करून घ्यावे आणि होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावा यावर मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे संचालन प्रांजली वानखडे यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. डॉ. अशोक भोरजार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निना चवरे यांनी मानले . या कार्यक्रमाच्या यश्स्वीतेकारीता डॉ. अशोक भोरजार , चेतन ढवळे ,प्रज्वल अढाऊ, आदींनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!