क्राईम न्युज

परस्पर जमीन विक्री करायला आलेल्या तीन एजन्टना, लोकांनी दिला बेदम चोप : धिंड काढून दिले पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

सांगलीतील कवलापूर येथील कोट्यवधी रुपयांची दोन एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर विक्री करायला आलेल्या तीन एजन्टना, लोकांनी बेदम चोप दिला. संतप्त नागरिकांनी त्या तिघांची धिंड काढून त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. कवलापूर येथील हरुगडे यांची जमीन ही त्यांना कोणती ही कल्पना न देता विकली जाणार होती. बोगस ओळखपत्र आणि कागद तयार करून दुययम निबंधक कार्यालय येथे विक्री करण्यात येत होती. सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळाली. त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात धडक देत पाच जणांच्या टोळीला पकडले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यावेळी तिघांना पकडून बेदम चोप दिला. नातेवाईकांचा रौद्रावतार बघून दोघे जण पळून गेले. घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी याठिकाणी झाली होती. अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!