राजकीय

पुणे-कोथरूडचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात

Spread the love

 (वर्षाराणी दुर्गे-सरुडकर) 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात काटा लढत होत आहे. कोल्हापूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची हा चंग भाजपाने बांधला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे त्यांच्या पुणे कोथरूड या मतदारसंघातील कार्यकर्ते कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत. भाजप पुणे येथील भाजपाचे विधानसभेचे प्रमुख, नगरसेवक महिला पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाहूंच्या नगरीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा विकासाचा अजेंडा घेऊन आणि भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा कोल्हापूर शहराचा आगामी काळात विकासाचा अजेंडा काय असेल हे संवादाच्या माध्यमातून मतदारांना पटवून देत आहेत. मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भाजपाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे अपयश हे प्रश्न घेऊन मतदारांना साद घातली जात आहे. मोदी सरकारने कोरोना काळात गोरगरिबांना दिलेले मोफत धान्य तसेच मोफत लसीकरण हे मुद्दे घेवून भाजपाने मतदारसंघ पिंजून काढला आहे. कोल्हापूर शहर मतदार संघात पुणे येथील कार्यकर्त्या सोबत कोल्हापूर शहरातील व ग्रामीणचे कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधील जनताही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही पण करा कोल्हापूरची जागा जिंका, असा आदेश पुणे कोथरूड येथील कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे कार्यकर्ते घर टू घर प्रचार करताना दिसत आहेत. यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. जर कोल्हापुरीची जागा भाजपने जिंकली तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. इतकेच नव्हे तर आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची राजकीय ताकद वाढणार आहे. पंढरपूर पॅटर्न राबून कोल्हापूरची जागा पटकावण्याचा मनोदय भाजपाने केला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेले शाहुवाडी -पन्हाळाचे आमदार विनय कोरे हे प्रचारासाठी शेवटचे पाच दिवस कोल्हापूर येथे तळ ठोकून बसणार आहेत. कोल्हापूर शहरातील जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद चांगली आहे. याचा फायदा भाजपाला व्हावा यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांनी ताकद लावली आहे. भाजपाचे आणि आमदार विनय कोरे यांच्या असलेले राजकीय सुत या निवडणुकीच्या निमित्ताने अधिक घट्ट होणार आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते प्रा जयंत पाटील हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!