राजकीय

सहानभूती नव्हे तर परिवर्तनाची लाट : उमाताई खापरे

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत सहानुभूतीची लाट नसून परिवर्तनाची लाट आहे, असे प्रतिपादन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी केले. त्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बालाजी गार्डन येथे महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम हे उपस्थित होते. त्या म्हणाल्या आपण कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जात आहे. राज्यात काय चालले आहे? असा प्रश्न करून त्या म्हणाल्या राज्यात तीन तिघाडीचे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिला मतदारसंख्या अधिक असल्याने तेथे भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. हीच पुनरावृत्ती कोल्हापूर येथे होणार आहे. कारण कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यासाठी महिला मोर्चाने पुढाकार घ्यावा, असे आव्हान त्यांनी केले. धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापुरात टोलचे आंदोलन चांगलेच गाजले होते. देवेंद्र देवेंद्र फडणवीस सरकारने 450 कोटी रुपये कंत्राटदाराला दिले. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न सोडवण्यात नरेंद्र मोदी सरकारला मोठे यश आले आहे. मोदी सरकारने बंद पडलेल्या कोल्हापूरच्या विमानतळासाठी 214 कोटी रुपये दिले आणि फडणवीस सरकारने 80 कोटी रुपये दिले. आघाडी सरकारने काय केले?असा प्रश्‍न करून ते म्हणाले जगातील पाच नद्या दूषित आहेत. त्यात कोल्हापूरच्या पंचगंगेचा नंबर लागतो. थेट पाईप लाईनचे काय झाले? याचा जाब कोल्हापूर शहरातील नागरिक आणि विचारावा. शहराचा इतिहास, भूगोल माहित असणाऱ्या सत्यजित कदम यांना निवडून देऊन कोल्हापूर शहराचा विकास करा, असे आव्हान त्यांनी केले. भाजपाचे वारे देशात आहे. हे वारे कोल्हापूर सुद्धा येणार आहे. राज्यातील आघाडी सरकारला मुळापासून उखडून टाकण्याची हीच वेळ कोल्हापूरच्या जनतेला आली आहे. कोल्हापूरची निवडणूक राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देणारी ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात घोषणांचा पाऊस पडत आहे. पण जनतेच्या हातात काहीच नाही. चार राज्यात भाजपला मिळालेल्या यशामुळे कोल्हापूर सुद्धा क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम म्हणाले कोल्हापूरची नस मी ओळखून आहे. कोल्हापूरचे विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर गेलो आहे. याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. कोल्हापुरातील जनतेने दिलेले प्रेम आणि आशीर्वाद पाहून आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!