क्राईम न्युज

दै.मुख्यमंत्री वृत्तपत्र व गोपनीय खबऱ्या (डिजिटल मीडिया) चे मुख्य संपादक संकेतराज बने यांच्यावरील हल्याचा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध

Spread the love

मालगाव रोडवर पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.दै.मुख्यमंत्री वृत्तपत्र व गोपनीय खबऱ्या (डिजिटल मीडिया) चे मुख्य संपादक संकेतराज बने यांच्या डोक्यावर आणि हातावर रॉड ने हल्ला करून त्यांना गंभीरपणे जखमी केले आहे.हमारे साहेब की बातमी लगाते है क्या असे म्हणत हा कोण साहेब आहे जो लोकशाहीच्या संपवणारा कोण ह्यो साहेब ? बने यांच्यावर सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोण आहे हा साहेब ? जो पत्रकारांना संपवण्याचा प्रयत्न करतोय ? एवढे धाडस कोणाचे ? या घटने मागील बोलाचा धनी नेमका कोण ? कोणाच्या सांगण्यावरून ही घटना घडली.या घटनेची चौकशी करून हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची  मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली  आहे.सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील, प्रतापराव शिंदे व पत्रकारांचे एक शिष्टमंडळाच्या वतीने  या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

याबरोबरच सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ,स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ,मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला कृती समितीच्या वतीने संकेतराज बने यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!