क्राईम न्युज

नेर्ले (ता.वाळवा) कराड येथे अवैधरित्या पिस्टल बाळगणारास कराड शहर पोलीस ठाणे कडून अटक .

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा)

कराड पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पिस्टल / अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडून सुचना प्राप्त होत्या. त्या सुचनांच्या अनुषंगाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवून कारवाई करणेकामी विशेष पथक कार्यरत होते. त्या दरम्यान सैदापूर होली फॅमीली याठिकाणी पांढऱ्या रंगाची ॲक्टीवा मोटार सायकल MH 50 J 6833 या गाडीवरून इसम नामे अखिलेश सुरज नलवडे हा पिस्टल घेवून फिरत आहे बाबत गोपनीय बातमी वपोनि बी.आर.पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत वपोनि बी.आर.पाटील यांनी सपोनि अमित बाबर सपोनि विजय गोडसे व त्यांचे पथकास कळवून पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे मिळाले बातमीच्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या व ओगलेवाडी दुरक्षेत्राचे पथकाने छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी अभिलेखावरील गुन्हेगार अखिलेश सुरज नलवडे हा संशयीतरित्या पकडले. त्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अखिलेश सुरज नलवडे वय 21 वर्षे, पीडी पाटील नगर, शिवार हॉटेल समोर,गजानन हौसिंग सोसायटी गोवारे रोड ता.कराड असे सांगितले त्याची दोन पंचासमक्ष जागीच अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेल्या MH 50 J 6833 या मोटार सायकलचे डिकीत पिस्टल ( अग्निशस्त्र ) 100,000/- रुपये किंमतीची एक सिल्वर रंगाची लोखंडी पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास लोखंडी मुठीस फायबर कव्हर असलेले देशी बनावटीचे मॅगझीन सह पिस्टल व 50,000/- रुपये किंमतीची ॲक्टीव्हा मोटार सायकल मिळून आली. गुन्हयाचा पुढील तपास सपेानि अमित बाबर हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्सल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर, सपोनि विजय गोडसे, पोउपनि अशोक भापकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, सचिन सुर्यवंशी, पोलीस नाईक संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे, धीरज कोरडे, किशोर तारळकर यांनी केलेली आहे.
कराड पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पिस्टल / अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडून सुचना प्राप्त होत्या. त्या सुचनांच्या अनुषंगाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवून कारवाई करणेकामी विशेष पथक कार्यरत होते. त्या दरम्यान सैदापूर होली फॅमीली याठिकाणी पांढऱ्या रंगाची ॲक्टीवा मोटार सायकल MH 50 J 6833 या गाडीवरून इसम नामे अखिलेश सुरज नलवडे हा पिस्टल घेवून फिरत आहे बाबत गोपनीय बातमी वपोनि बी.आर.पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत वपोनि बी.आर.पाटील यांनी सपोनि अमित बाबर सपोनि विजय गोडसे व त्यांचे पथकास कळवून पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे मिळाले बातमीच्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या व ओगलेवाडी दुरक्षेत्राचे पथकाने छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी अभिलेखावरील गुन्हेगार अखिलेश सुरज नलवडे हा संशयीतरित्या पकडले. त्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अखिलेश सुरज नलवडे वय 21 वर्षे, पीडी पाटील नगर, शिवार हॉटेल समोर,गजानन हौसिंग सोसायटी गोवारे रोड ता.कराड असे सांगितले त्याची दोन पंचासमक्ष जागीच अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात असलेल्या MH 50 J 6833 या मोटार सायकलचे डिकीत पिस्टल ( अग्निशस्त्र ) 100,000/- रुपये किंमतीची एक सिल्वर रंगाची लोखंडी पिस्टल (अग्निशस्त्र) त्यास लोखंडी मुठीस फायबर कव्हर असलेले देशी बनावटीचे मॅगझीन सह पिस्टल व 50,000/- रुपये किंमतीची ॲक्टीव्हा मोटार सायकल मिळून आली. गुन्हयाचा पुढील तपास सपेानि अमित बाबर हे करत आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्सल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित बोऱ्हाडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर, सपोनि विजय गोडसे, पोउपनि अशोक भापकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, सचिन सुर्यवंशी, पोलीस नाईक संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे, धीरज कोरडे, किशोर तारळकर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!