देश विदेश

भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या वतीने मानव साखळी आंदोलन

Spread the love

देशाचे  पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी हे दि. 05 जानेवारी 2022 रोजी पंजाबच्या विकासासाठी नियोजित दौऱ्यावर असतांना, पावसाचे वातावरण असल्याने सुरक्षा कारणास्तव त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पूर्व नियोजित दुसऱ्या रस्त्याच्या मार्गाने वाहनाने त्यांना सभास्थळी जाण्याचे ठरले. मा. पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम हें अतिशय गुप्त, सुरक्षित असतांना त्यांच्या वाहनाच्या मार्गावर जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या नावाखाली काँग्रेस पार्टीचे गुंड बसवून मोदीजींच्या वाहनाचा ताफा अडवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचे पाप हें पंजाब मधील काँग्रेस सरकार ने केले आहे.

पंजाब काँग्रेस सरकार व मुख्यमंत्री चन्नी यांनी केलेल्या या षडयंत्रा विरोधात “भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्या” वतीने “मानव साखळी” निर्माण करत “तोंडला काळ्या पाट्या” बांधून पंजाब सरकार व काँग्रेसचा निषेध शिर्डी येथे श्री संत सावता महाराज मंदिर, पालखी मार्ग येथे करण्यात आला..
यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी भाषनाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला.
. यावेळी भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष मा.आ. श्री योगेश अण्णा टिळेकर, आ. मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर यांच्या सुचनेने तसेच भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर यांचच्या प्रमुख उपस्थितीत व तालुक्षध्यक्ष श्री स्वानंद रासने यांच्या नेतृवाखाली तसेच ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऍड श्री विक्रांत वाकचौरे, तालुका ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष श्री जितेंद्र माळवादे, शहर ओबीसी युवा अध्यक्ष श्री वैभव शिंदे तालुका सरचिटणीस श्री योगेश बडे, श्री संजय सजन, प्रसिद्धी प्रमुख श्री संजयजी महाजन, श्री सुनिल भुजाडे, श्री दिपक वाघ, श्री शशिकांत महाले,श्री शरद शिंदे, खजिनदार श्री सोमनाथ शिंदे श्री अक्षय शिरसाठ, श्री अरबाज पठाण, श्री दिलीप चौधरी, श्री महेश आहेर, श्री श्रीधर बेंद्रे, श्री संपत जाधव, श्री प्रवीण आणप, श्री अजय व्यवहारे, श्री विजय सजन आदी भाजपा ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!