राजकीय

गौंडवाडी,साटपेवाडी,बनेवाडी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने १३-० ने विरोधी पॅनेलचा उडविला धुव्वा

Spread the love

इस्लामपूर दि.८ प्रतिनिधी
गौंडवाडी,साटपेवाडी,बनेवाडी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने १३-० ने विरोधी पॅनेलचा धुव्वा उडविला आहे. विजयी उमेदवार व नेत्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्या स अभिवादन केले. या संस्थेची स्थापना १९५४ साली करण्यात आली असून वार्षिक उलाढाल ५ कोटींच्या रुपयांच्या आसपास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी विजयी उमेदवार व नेत्यांचा कारखाना कार्यस्थळावर स्वागत सत्कार केला.
विजयी उमेदवार-धनाजी चव्हाण,यशवंत चव्हाण,शंकर धोत्रे,अशोक जाधव,तुकाराम जाधव, बाळासो साटपे,शशिकांत साटपे, पतंग यादव, सौ.सुवर्णा साळुंखे, सौ.सुशांता यादव. उदयसिंग घोगरे,दीपक भोसले, विलास कुंभार हे बिनविरोध निवडून आले आहेत.
राजारामबापू सहकारी बँकेचे माजी संचालक काकासो यादव,वाळवा बझारचे माजी उपाध्यक्ष रघुनाथ साळुंखे,सूतगिरणीचे संचालक जयवंत पाटील,सुभाष यादव बनेवाडी,युवक कार्यकर्ते विनायक यादव, तुषार चव्हाण,माजी सरपंच बाबासो चव्हाण, अधिक चव्हाण,तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिदानंद साटपे,संतोष चव्हाण बनेवाडी,राजेश यादव बनेवाडी,अशोक चव्हाण गौंडवाडी,प्रकाश चव्हाण बनेवाडी,शिवाजी धोत्रे बनेवाडी, साटपेवाडीचे अशोक साटपे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते  राजारामनगर येथे स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन करताना साटपेवाडी, गौंडवाडी,बनेवाडी सेवा सोसायटीचे नूतन संचालक. समवेत विजयराव पाटील,काकासो यादव,रघुनाथ साळुंखे,जयवंत पाटील, विनायक यादव,तुषार चव्हाण,अधिक चव्हाण,बाबासो चव्हाण,सुभाष यादव व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!