कृषीवार्ता

शंकर सोनटक्के यांनी आपला वाढदिवस साजरा केला गोर गरीब कुटुंबांना अन्नधान्य , झाडे वाटप करून.

Spread the love

शंकर सोनटक्के यांनी आपला वाढदिवस साजरा केला गोर गरीब कुटुंबांना अन्नधान्य , झाडे वाटप करून.

शिराळा प्रतिनिधी
शंकर सोनटक्के सर्वांना बरोबर घेऊन सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारे त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला मात्र त्यांनी उपस्थित सर्वांना झाडे देऊन तसेच तुला केलेले पाच प्रकारचे धान्य ,साखर याचे गोरगरीब लोकांना वाटप केले.शंकर सोनटक्के यांनी घरातीलच नव्हे तर इतर कुटुंबातील अनेकांना उद्योग , नोकरी लावण्यासाठी हातभार लावला आहे. त्यांची एकषष्ठी साजरी करण्यात आली. यावेळी ३०० पेक्षा जास्त मित्रमंडळी, नातेवाईक उपस्थित होते त्या प्रत्येकाला झाडे भेट दिली. उपस्थितांचा असा वेगळा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर यांची पाच विविध धान्य आणि साखर याची वेगवेगळी तुला करण्यात आली. ही तुला केलेली साखर गोरगरीब नागरिकांना तसेच मूक बधिर शाळेत देण्यात आली.
पाच प्रकारचे तुला केलेले धान्य श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत टाकण्यात आले जेणेकरून हे धान्य पशुपक्षी खातील किंवा उगवून आलेले पीक मुक्या जनावरांना चारा म्हणून उपलब्ध होईल.याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक , माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटे ,बी टी निकम , युवराज गायकवाड , महाबळेश्वर चे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे , नंदकुमार शेटे , सातारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंकज पिलके , दिलीप सोनटक्के , आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!