क्राईम न्युज

शिराळा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत हातचलाखीने महिलेला फसवणारे दोन चोरट्यांना चोवीस तासात अटक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

याबाबत रेड (ता. शिराळा) येथील संजीवनी जयवंत मरळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी काल सोमवारी दि. ४ रोजी दुपारी ३.१५ रोजी शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत संजीवनी मरळे या बचत गटाकडून २००००/हजार रुपये घेतलेलं कर्ज काढण्यासाठी शिराळा शाखेत गेल्या होत्या. त्यावेळी संशयित आरोपी नबीलाल शहाजान इरानी व मिथुन अशोक काळे राहणार जयसिंगपूर यांनी संजीवनी यांना सदर नोटा फाटक्या खोट्या असल्याचे सांगून त्यांच्याजवळील पैशाचा बंडल आपल्याजवळ घेतला. यामधील दोनशे रुपयाच्या 29 नोटा पाच हजार आठशे रुपये हातचलाखीने लंपास केले. त्यानंतर उर्वरित नोटांचे बंडल संजीवनी यांच्या हातात संशयितांनी दिले.
याच दरम्यान संजीवनी यांचे पती जयवंत मरळे हे बँकेत आले असता त्यांनी पैसे मोजले त्यावेळी त्यात पाच हजार आठशे रुपये कमी असल्याचे आढळून आले. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता. पैसे बरोबर दिले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी पैसे त्या दोन व्यक्तीने घेतले असावेत असा संशय संजिवनी यांना आला. त्यामुळे याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन याचा तपास जलदगतीने सुरू केला. यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोन आरोपी जयसिंगपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. शिराळा येथील पोलीस पथक जयसिंगपूर मध्ये दाखल झाले असता नबीलाल शहाजान हिरानी अहिराणी गल्ली व मिथुन अशोक काळे राहणार नवी गल्ली यांना पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस हवालदार कालिदास गावडे,पोलीस नाईक नितीन यादव, हरेश पितळे ,अमर जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास हरेश पितळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!