क्राईम न्युज

पर्स चोरट्या महिलेला कासेगाव पोलीसांनी शिताफीने पकडले

Spread the love

दिनांक १७.०९.२०२२ रोजी यातील फिर्यादी नामे श्रीमती सुनिता तात्यासाहेब पाटील रा कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ जि. सांगली हया पुणे येथून पुणे ते सांगली या बसमध्ये बसून प्रवास करीत होत्या सदर बसमध्ये यातील आरोपी हे कराड येथून बसून प्रवास करीत होत्या. सदर गुन्हयातील फिर्यादी हया कासेगांव येथे आल्या असता त्यांचे लक्षात आले की, त्यांचेजवळ असलेली पर्स मिळून आली नाही म्हणून त्यांनी सदर बसमध्ये शोधा शोध करुन आरडा ओरडा करु लागल्या त्या दरम्यान सदरची बस ही नेर्ले येथे पोहचली असता सदर गुन्हयातील संशयीत महिला हया नेलें एस टी स्टॅन्ड येथे बसमधून घाई गडबडीत खाली उतरल्या त्याच्या पाठोपाठ सदर गुन्हयातील फिर्यादी खाली उतरल्या त्या दरम्यान सदरच्या संशयीत महिला हया तेथून कोठेतरी निघून गेल्याच्या फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने व त्यांनी त्यांची पर्स चोरली असल्याचे फिर्यादी यांचे लक्षात आल्याने त्या कासेगांव पोलीस ठाणेत आल्या व त्यांनी सदर झाले घटनेबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाणेत हकीकत सांगितली व संशयीत महिलांचे वर्णन सांगितले, सदरच्या महिला हया नेलें एस टी स्टॅन्ड येथे उतरल्या असल्याचे सांगितल्याने पोलीस ठाणेकडील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना केले असता सदर पथकातील पोलीस कर्मचारी राहुल पाटील यांना सदरच्या महिलांच्या ठाव ठिकाण्याबाबत गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरच्या संशयीत महिला हया कराडच्या दिशेने चालल्या असल्याची माहीती मिळाली मिळाले माहिती प्रमाणे सदर महिलांना महिला पोलीस कर्मचारी यांचे मार्फतीने ताब्यात घेवून कासेगांव पोलीस ठाणेत घेवून आले असता सदर संशयीत महिला यांची महिला पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने झडती घेतली असता त्या संशयीत महिला यांचेकडे फिर्यादी एक पांढरे रंगाची पर्स त्यामध्ये रोख ५,०००/- रुपये मिळून आले तसेच संशयीत महिलांच्याकडे १) ५५,०००/-रु. किंमतीचा एक लक्ष्मीहार २) ४६, ६६५/ रु. किंमतीचा एक नेकलेस तुटलेला ३) ३६,४१४ /- रु. किंमतीचा एक दोरा गंठन पदक त्यास अष्टपैलु मणी ४) ८५६/-रु. किंमतीची एक बारशे अंगठी असा एकूण १ लाख ४४ हजार ३९५ रुपये किंमतीचा मिळून आला सदर मालाबाबत चौकशी केली असता सदर संशयीत महिलांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत यावरुन सदर मिळून आलेला माल हा चोरीचा माल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक -शिवाजी यादव कासेगांव पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!