क्राईम न्युज

किवळे परिसरात दहशत निर्माण करत १८ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने क्रूर हल्ला

Spread the love

देहूरोड :येथील किवळे परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत एका  युवकाने १८ वर्षीय युवकावर क्रूरपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुक्ताई चौक, किवळे येथे रविवारी ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता हा प्रकार घडला.

या घटनेतील जखमी १८वर्षीय अदनान शेख याच्या फिर्यादीवरून अजिंक्य तिखे (वय २८, रा.गहुंजे गाव ) व एक अल्पवयीन युवक अशा दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताई चौक, किवळे येथे अदनान व अजिंक्य दोघेही मासे विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांची दुकाने शेजारी- शेजारीच आहेत. दुकान लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून येथे दुकान लावले तर तुला मारून टाकणार अशी धमकी देत मासे कापायचे कोयते व सु-या या धारदार शस्त्रांनी अदनानवर हल्ला करण्यास अजिंक्य व त्याच्या साथीदाराने सुरुवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही मारून टाकण्याची धमकी देत आरडाओरडा करत दहशत निर्माण करण्याचा आरोपीने प्रयत्न केला .स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अदनानने तेथून पळ काढला असता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत अजिंक्य व त्याच्या साथीदारांनी अदनानचा पाठलाग केला.

घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.अदनानवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेतील आरोपींवर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे समोर येत आहे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास लांडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!