देश विदेश

दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न

Spread the love

आगरा (उत्तरप्रदेश) – हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे प.पू.आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापासून गावस्तरापर्यंत पोचलेली ही दौड आता उत्तरप्रदेशमध्येही चालू झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासात आगरा आणि तेथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. अशा लाल किल्ल्यावर या वर्षी आगर्‍यातील काही धारकर्‍यांनी आणि शिवभक्तांनी दुर्गामाता दौड चालू केली आहे. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने हा अत्यंत अनोखा आणि विशेष उपक्रम सर्वांना नवरात्रीमध्ये प्रतिदिन सकाळी पहायला मिळत आहे. मराठा समाजाचे सर्व शिवशंभू भक्त आणि धारकरी प्रतिदिन या दौडीमध्ये शेकडो च्या संख्यने उत्साहाने सहभागी होत आहेत. यात छत्रपती श्री शिवाजी महाराज गणेश ट्रस्ट मंडळ आगरा चे विशेष सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!