देश विदेश

इनडोअर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाला पुरुष-महिलांचे विश्वविजेतेपद

Spread the love

तर न्यूझीलंडला २२ वर्षाखालील मुलांचे व मुलींचे विश्वविजेतेपद
उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुध्द भारत पराभूत
जागतिक क्रमवारीत भारत तिसर्‍या क्रमांकावर

सिडनी, १५ ऑक्टोबर, (क्री. प्र.): जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरुष गटात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला १२० विरुध्द ५७ असे ६३ धावांनी पराभूत करत २०२२ च्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. तर महिलांच्या अंतिम सामान्य ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ११७ विरुध्द १११ असे ६ धावांनी निसटता पराभव करत विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. २२ वर्षाखालील मुलांच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला ९५-५६ असे ३९ धावांनी पराभूत केले. तर २२ वर्षाखालील मुलींच्या सामन्यात न्यूझीलंडनेच ऑस्ट्रेलियाला ८९-८८ असा १ धावेने चुरशीच्या सामन्यात पराभूत करून २०२२ च्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.

तत्पूर्वी झालेल्या निर्णायक उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ११५ विरुध्द ७७ असा ३८ धावांनी पराभव केला. या पूर्वी भारताने दुसर्‍या पात्रता सामन्यात श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न दाखवले मात्र साखळीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडने भारताला धूळ चारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. इनडोअर क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघ तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करणार्‍या न्यूझीलंडच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २५, ३२, १९, ४१ असे ११५ धावांत रोखले. मात्र न्यूझीलंडने भारतीय संघाला २८, १३, ५ व ३१ असे ७७ धावांत गुंडाळून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. दुसर्‍या व तिसर्‍या जोडीतिल फलंदाज अनुक्रमे ४- ४ वेळा बाद झाल्याने भारताला मोठा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भारताने ६ विजय मिळवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!