क्राईम न्युज

देशी बनावटीच्या पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे व मोटरसायकल, असा एकुण २,०२०००/-रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

गुन्ह्याची थोडक्यात हकिकत इस्लामपुर पोलीस ठाणे मध्ये मा. श्री बसवराज तेली सो, पोलीस अधीक्षक सांगली, मा. श्रीमती आँचल दलाल सो, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी अवैद्य अग्नीशस्त्र जप्त करणेबाबत विशेष मोहीम  राबवणेबाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मा. श्रीमती पद्मा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा चार्ज -इस्लामपुर व मा. श्री. शशिकांत चव्हाण सो पोलीस निरीक्षक, इस्लामपुर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सपोनि श्री. प्रविण साळुंखे, उत्तम माळी, दिपक ठोंबरे, सोमनाथ पाटील, अरुण पाटील, गणेश शेळके, सुरज जगदाळे, उमेश शेटे, आलमगिर लतिफ, सचिन सुतार, शशिकांत शिंदे असे इस्लामपुर पोलीस ठाणेत हजर अस खासबातमीदार यांचे मार्फत माहीती मिळाली की, कराड- ताकारी जाणारे रोडने दोन इसम मोटरसायकल वरुन ताकारी बाजुकडे देशी बनावटीचे बेकायदेशीर पिस्टल घेवुन ताकारी बाजुकडे विक्री करीता जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण यांचे सुचने प्रमाणे सदरचे पथक किल्लेमच्छिंगड खिंडीमध्ये जावुन सापळा रचुन वॉच केला असता कराड बाजुकडुन दोन इसम मोटरसायकल वरुन येताना दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा करुन त्यांना किल्लेमच्छिंगड खिंडीमध्ये रोड वर थांबवले असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) श्रीकांत बाळासो खांडेकर वय २१ वर्षे, रा. टाकळवाडी ता. फलटण जि.सातारा २) केतन विश्वनाथ कर्वे वय- ३७ वर्षे रा. पळशी ता. बारामती जि.  पुणे अशी असल्याचे सांगितल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेली कापडी पिशवी चेक केली असता प्लास्टीक पिशवी मध्ये ०३ देशी बनावटीच्या पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे व मोटरसायकल, असा एकुण २,०२०००/-रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना पोलीस ठाणेत आणुन त्यांच्या वरती गुन्हा दाखल करुन सदर आरोपीकडे तपास सुरु असुन त्यानी सदरच्या पिस्टल व जिवंत काडतुस हे कोणाकडुन आणले याबाबत अधिक तपास सुरु

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!