राजकीय

राज्य सरकार विरोधात एसटी कामगार संघटनेचा टाहो..

Spread the love

राज्यातील आघाडी सरकार विरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. ते कोल्हापूर येथे भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्य शासन एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनाला चिरडून टाकत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तोंडाला येईल तसे बोलत आहेत. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा विचार केला आहे का? असा सवाल करून कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा कामगारांनी दिल्या. संप सुरू असल्यापासून हजारो कामगार मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकार विलीनीकरण करण्याबाबत सहमत नाही. आमची मागणी रास्त आहे. ती सरकारला मान्य करावेच लागेल, अशा शब्दात सरकारला ठणकावले आहे. कामगार संघटनेच्या आंदोलनाला सर्वसामान्यांचे पाठबळ आहे. परंतु राज्य सरकार मुस्कटदाबी करत आहे. राज्य सरकारने आम्हाला अल्टिमेटम दिला आहे. या अल्टिमेटम ला आम्ही भीक घालत नाही. उलट सरकार विरोधात लढण्याचे बळ मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. परंतु त्यांनी आधी आपल्या बारामतीत जाऊन तेथेच कर्मचाऱ्यांना समजवायचा प्रयत्न करावा, मग महाराष्ट्रातील कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना अल्टिमेटम द्यावा, असे आव्हान एसटी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल आहे. एसटी महामंडळ म्हणजे कोणाच्या बापाची मालकिन नसून सर्वसामान्यांच्या पाठबाळावर महामंडळाची चाके चालत आहेत. राज्यातील आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. जे नवाब मलिक यांचे झाले त्या दिशेने अनेक मंत्री जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. सर्वसामान्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या विरोधात असंतोष मतदानाचा रुपा त कोल्हापुरात दाखवून देऊच. कोल्हापुरातील कामगार संघटनेला ही चालून आलेली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या, असे आव्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांना केले. या क्रांतीची मशाल महाराष्ट्रात पेटवत ठेवून आघाडी सरकारला याची किंमत मोजावी लागेल. कोल्हापूरचा विजयी हा सर्वसामान्य कामगारांचा विजय असेल. भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना विधानसभेत पाठवून एसटी कामगार संघटनेचा आवाज बळकट करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!