देश विदेश

उच्चांकी कर संकलन ₹ @डॉ• डी• एस•काटे••

Spread the love

कोरोनाच्या महासाथीमुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसताना दिसत आहे..

भारतीय अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची उभारी मिळत आहे ..

याचे उदाहरण म्हणजे काल जाहीर झालेली मागील आर्थिक वर्षातली जीएसटी संकलनाची आकडेवारी.

*सरत्या आर्थिक वर्षात तब्बल २७.०७ लाख कोटी रुपयाची विक्रमी कर वसुली झाली* असे अर्थ मंत्रालयाकडून सुचित करण्यात आले..

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर वसुलीत मागील वर्षीच्या तुलनेने ३४ टक्क्याने वाढ झालेली आहे ..

त्याच बरोबर मुख्य गोष्ट आपणास निदर्शनास आणावी असे वाटते की प्रत्यक्ष कराची वसुली ३४ टक्‍क्‍यांनी वाढलेली आहे ..

इतर देशातील अर्थव्यवस्था सध्या संघर्षाच्या वाईट अवस्थेमधून जात आहेत,त्याचबरोबर आपल्या शेजारील देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन राज्यव्यवस्था ह्या पूर्णपणे धुळीस मिळत आहेत..

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार घडत चाललेली समाजव्यवस्था त्याच बरोबर आर्थिक प्रगती निश्चितच भूषणावह आहे..

कालच रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनीही आपले पतधोरण निश्चित केले. या पतधोरणात..ग्राहकांना व नागरिकांना थोडा दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ..

या पतधोरणात अपेक्षित होते काहीतरी थोडीफार रेपो रेट मध्ये बदल होईल. पण त्यांनी तसं काही न करता मागील रेपो दरात कोणताही बदल केला नाही ही एक आनंदाची बाब मानली जाते ..

त्याचबरोबर जीडीपी सुद्धा ७.८ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे…
असे असले तरी महागाईचा दर ५.७ टक्के पर्यंत असणार हे धोक्याचे वाटते..

एकीकडे सरकारी तिजोरीत मुबलक कर जमा होत आहे,
तर दुसरीकडे जनता महागाई व भाव वाढ, त्याचबरोबर इंधन दरवाढ यांच्या संघर्षात रगडत आहे…

असे विक्रमी कर संकलन होत असताना सरकारने सामान्य जनतेचा विचार करून इंधन दरांमध्ये कपात करणे अपेक्षित आहे …
त्याचबरोबर महागाईला लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलणे सरकारचे आद्य कर्तव्य वाटते….
नाहीतर ??

*जैसे कां कुडे नाणे*,
*खर्चाचेनि सारखेरेपणे*,”
*डोळ्याचेंहि देखणे* *संशयी घाली* या उक्तीप्रमाणे
जनतेस अशा विक्रमी कर संकलना मुळे जर दिलासा मिळाला नाही..
तर ही आकडेवारी खोटी वाटून … भ्रमनिरास होईल.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थिती मध्ये रशियाकडून कच्चे तेल आयात करण्याची मोठी संधी आपल्या देशाला आहे .

.रशियाबरोबर आगामी वर्षांमध्ये मोठे करार करून या संधीचा फायदा आपल्या देशाने घेण्याची वेळ आता आलेली आहे..

कमी दरामध्ये इंधन आयात करून त्याचा फायदा जनतेस होईल का? याचीही चाचपणी करणे गरजेचे आहे…

*तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो*
ही सरकारची वृत्ती योग्य राहनार नाही …

जनता तर कर भरून देशाच्या हितासाठी व प्रगतीसाठी मदत करत आहे ..एकीकडे त्यांना दिलासा देऊन महागाईच्या जखमा कमी करण्याची आणि कोरोना काळातील डबघाईस आलेल्या उद्योग-व्यवसायास मदतीचा हात देण्याची सर्वांची अपेक्षा आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!