आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

लोणावळा शहर हद्दीत पोहण्याचे तलावात तरूणाचा बुडून मृत्यू..

जुना खंडाळा मार्गालगत पापाव्हिला स्विमिँग पूलमधे दुर्घटना.. .

Spread the love

लोणावळा शहर हद्दीत पोहण्याचे तलावात तरूणाचा बुडून मृत्यू.. जुना खंडाळा मार्गालगत पापाव्हिला स्विमिँग पूलमधे दुर्घटना .

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ५ जानेवारी.

लोणावळा शहर हद्दीत पोहण्याचे तलावात बुडून मरण पावल्याची दुर्घटना ;जुना खंडाळा मार्गालगत पापाव्हिला स्विमिँग पूलमधे दुर्घटना घडली. गेल्या सहा महिन्यातील ही चौथी दुर्घटना आहे.

लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकस्मिक मयत रजिस्टर क्रमांक १/२३ नुसार कलम १७४ नुसार आपघाताची नोद केली आहे.मयताचे नाव – निखिल संपत निकम (वय- वय २२, वर्ष ,राहणार सुखवानी पॅसिफिक , फ्लॅट नंबर ७०२,आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोर ,थेरगाव ,चिंचवड ,पुणे) असे आहे.
याबाबत खबर देणार:- विशाल नानासाहेब निकम ( वय -३२, वर्ष राहणार फ्लॅट नंबर ४०४, शिवराम हाईट्स पुनावळे तालुका हवेली जिल्हा पुणे ) यांचेकडून खबर देण्यात आली आहे.यातील घटना घडलेली वेळ ठिकाण दि.04/01/2023 रोजी रात्री 03.30 वा.चे पूर्वी. अशोक निर्वाण सोसायटी जुना खंडाळा रोड पाप व्हीला स्विमिंग पूल येथे ही दुर्घटना घडली. ता.४ रोजी वेळ सकाळी ९वा.५२ मिनिटांनी या अपघातात मृत्यूमुखी पडल्याची नोँद करण्यात आली आहे.

याबाबत घडलेली हकीकत आशी : वर नमूद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील मयत निखिल संपत निकम व त्याचे इतर दहा मित्र हे गुणरत्न कुलकर्णी याचा वाढदिवस साजरे करण्यासाठी आले असता ; निखिल याचा पाण्यात पोहत असता त्याचा बुडून मृत्यू झाला ..या मजकुरावरुन वगैरे मजकुरावरून मयत दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये पोलिस उपनिरिक्षक  मुजावर व पोलिस हवालदार  म्हेत्रे करीत आहे.

लोणावळा नगरपरिषद प्रशासनाचे दूर्लक्ष : लोणावळा शहर हद्दीत गेल्या काही महिन्यांत पोहण्याचे तलावात लहान बालकांचे व तरूण पर्यटकांचे बळी जात असून याकडे लोणावळा नगरपरिषद प्रशासक , अधिकारी तसेच नगरविकास विभागाचे मंञी , सचिव यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.याबाबत तातडीने जितके स्विमिँग पूल आहेत , त्यांचेकडून सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या की नाही , हे पाहून आनधिकृत व सुरक्षेचे नियम धुडकावून लावणारे हाॕटेलवाले व बंगलेवाले यांचेवर कारवाई करणे गरजेचे आहे.अशी लोणावळेकर नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!