कृषीवार्तादेश विदेश

विनोदाने वास्तवावर मार्मिक भाष्य करणारे निर्माणकर्ता जसपाल भट्टी!

Spread the love

आवाज न्यूज विशेष : २५ ऑक्टोबर २०१२ ला अचानक बातमी भट्टी यांच्या मृत्यूची बातमी आली. उल्टा पुल्टा , माहोल ठीक है, फुल टेन्शन यांसारख्या दर्जेदार प्रहसनात्मक मालिकांचे कर्ते धर्ते आणि आपल्या गंभीरपणे विनोदी शैलीत मार्मिक भाष्य करणारे जसपाल भट्टी यांचा ९ वा स्मृतिदिन.

खरतर आजही जसपाल भट्टी यांची अनेक प्रहसने पाहाताना ती कालातीत आहेत. आजच्या काळात ही ती आजचीच वाटतात. आजच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य ही त्यात सापडते. बरं! जसपाल भट्टी यांचे भाष्य इतके मार्मिक असते की ज्याच्यावर ते आहे तो ही वेगळा राग न मानता आपल्या चुकीवर,पापावर मनमुराद हसतो अन आत्मपरीक्षण ही करतो.
गंभीर परिस्थितीत ही कसा विनोद दडलेला असतो जसपाल भट्टीं इतके अचुक फार कमी लोक दाखवु शकले. चार्ल्स चॅप्लिन च्या नंतर इतक्या बेमालूम पणे मार्मिकता भट्टी यांनीच साधली, असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

जसपाल भट्टी स्टेज शोज ही करायचे, त्यात पंजाबी भाषेतील विनोदांचा जबरदस्त तडका असायचा. रांगडा विनोद हा पंजाबी भाषेतील एक वैशिष्ट्य तेच हिंदी भाषेत बेमालूमपणे मिसळून भट्टी साहेब आपले प्रहसन पेश करायचे. यात त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ लाभली ती सविता भट्टी या त्यांच्या पत्नीची. विवेक शॉक,बी एन शर्मा,सुनील ग्रोवर सारख्या हरहुन्नरी कलावंतांना पुढे आणुन त्यांच्या कलेला भरारी देण्याचे मोलाचे काम भट्टी यांनीच केले.

खरतर समाजमाध्यमांवर त्यांची प्रहसन बघताना त्यांची उणीव जाणवते.आज सुध्दा भट्टी साहेबांना विषयांचा खुराक कमी नव्हता.आजची राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे पाहाताना जसपाल भट्टी यांनी अक्षरश:धुमाकूळ घातला असता हे जाणवते. आज जे विनोदबुद्धी कमी झाल्याची उदाहरणे सापडतात ती विनोदबुद्धी शाबूत ठेवण्याचे मोलाचे काम त्या काळात जसपाल भट्टी करत होते. तसे ते काम आजही होत आहे कारण अजुनही भट्टी साहेबांच्या मालिकांच्या , चित्रपटांना युट्युब वर हजार आणि लाखांचे व्ह्यूज मिळतात. आजची तरुणाई ही त्यांचे विनोद मनापासून पसंत करते ही याचीच पोचपावती आहे.

जसपाल भट्टी यांनी एकदा दोनदा निवडणूक ही लढवली होती याची आठवण होते. नॅशनल करप्शन पार्टी हे पक्षाचे नाव आणि त्या अंतर्गत लाच देणे घेणे ऑफिशियल करण्याची घोषणा ही खूप खळबळ करणारी म्हणून गाजली होती. त्यावेळच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत खुपच मनोरंजक आणि समाजाला आरसा दाखवणा-याच होत्या.

जसपाल भट्टी साहेब तुम्ही होतात म्हणून आमचे बालपण सुसह्य होतेच, आज आमचे तारुण्य ही आम्ही हसत खेळत व्यतीत करतोय अन पुढे ही आम्ही हसतच सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ….अशा या सर्वार्थाने बिलंदर असणाऱ्या महान कलावंताला हा सलाम…..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!