देश विदेश

नॅशनल फिशवर्कर्स फोरम व् दिल्ली फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांसाठी कार्यशाळा

Spread the love

तामिळनाडू : नॅशनल फिशवर्कर्स फोरम व् दिल्ली फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने किनाऱ्यावरील मच्छिमारांचे हक्क (कोस्टल राईट्स ऑफ फिशरमॅन व सी. आर‌. झेड. २०१९ ) या बाबत दि. १४,१५ व १६ डिसेंबर २०२१ रोजी बीच रिसॉर्ट कॉम्प्लेक्स, मामलंपूरम,महाबलीपूरम, तामिळनाडू येथे तिन दिवसांची कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली आहे, ह्या कार्यशाळेसाठी ९ किनारी राज्यातील NNF च्या सल्लग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

आजच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये लिओ सलडाना ESG India (Envirement Suport Group) आणि फौंडिंग मेंबर ऑफ एन्वायरमेंट्स जस्टीस इन इंडिया यांनी पारंपारीक मच्छिमाराना सी.आर.झेड, किनाऱ्यावरील मच्छिमारांचे जमिनीचे हक्क, आर्थिक हक्क,जातीचे हक्क, मानवी संसाधन हक्क, पारंपारिक सांस्कृतीक हक्क, पर्यावरण विषयक हक्क, ऐतहासिक हक्क तसेच राजकीय हक्का बाबत बंगलोर हून ऑनलाईन द्वारे महत्वाची उपयुक्त माहिती दिली.

दुपारच्या सत्रा मध्ये डॉ. अपर्णा सुंदर, सिनिअर अकॅडमिक स्कॉलर आणि टीचर,रिसर्चर, टोरॉन्टो, कॅनडा यांनी किनाऱ्यावरील जमिनी चे हक्क,सी.आर.झेड. ची ऐतिहासिकता व सत्यता (कोस्टल लँड राईट,हिस्टरी ऑफ सि.आर. झेड. अँड रिऍलिटी) याबाबत उपयुक्त महत्वाची माहिती कॅनडा हून ऑनलाईन द्वारे दिली. ह्या कार्यशाळे साठी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे अध्यक्ष लिओ कोलसो, कार्याध्यक्ष व NNF चे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी तसेच NNF च्या सेक्रेटरी व MMKS च्या पालघर/ठाणे जिल्हा महिला संघटक  ज्योती मेहेर उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!