आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लोणावळा पोलिसांनी केले जेरबंद

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना पकडण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.

सोहेल जावेद शेख (वय 20 वर्ष ),ओमकारसिंग अवतारसिंग जुनी (वय 21 वर्ष) व दोन अल्पवयीन मुले सर्व राहणार वैदवाडी हडपसर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपींनी शहरातील काही बंगल्यांची रेकी केली होती. खंडाळा भागात रात्रगस्त करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे यांना गुप्त बातमीदार यांमार्फत माहिती मिळाली खंडाळा गावच्या हद्दीत टाटा डक लाईन येथील पडीक डीपी रूम मध्ये काही इसम दरोडा घालण्याच्या तयारीत बसलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलिस पथकाने सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले.

यापैकी एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत तर इतर आरोपीवर चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपी असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. त्यांच्याकडून विळे, चाकू, स्क्रू ड्रायव्हर, वस्तारा, ब्लेडची पाती, कात्री, वायर कटर ,लाल मिरचीची पूड असे साहित्य मिळालेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर ,पोलीस अंमलदार सुनील देशमुख, प्रवीण कुमार गोसावी, शेखर कुलकर्णी ,सतीश कुदळे, पवन कराड ,शंकर धनगर, मनोज मोरे, स्वप्नील पाटील, प्रवीण गोसावी, पोलीस मित्र विनोद चव्हाण यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!