देश विदेश

प्रलंबित कामांसाठी आमदार सुनील शेळके यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Spread the love

दिल्ली : मावळ तालुक्यातील प्रलंबित कामांसाठी आमदार सुनील शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह बुधवारी (दि. 30) रोजी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितिन गडकरी,केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शेळके सातत्याने प्रयत्न करत आहेत. मावळ तालुक्यातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारे रस्ते, वन विभागाच्या तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रखडलेल्या विकास कामांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी आमदार शेळके यांनी दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

खासदार शरद पवार यांचे संबंधीत खात्याच्या मंत्री महोदयांना पत्र 

या दिल्ली दौऱ्यात आमदार सुनील शेळके यांनी खासदार शरद चंद्र पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पाठपुरावा करत असलेल्या कामांची माहिती दिली. या प्रलंबित कामांचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार शरद चंद्र पवार यांनी त्वरित संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांशी यासंदर्भात तात्काळ पत्रव्यवहार केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!