देश विदेश

खोट्या अट्रोसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Spread the love

 

नवी दिल्ली  : अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात चार भिंतींच्या आत काही अपमानजनक बोलल्यास किंवा त्या गोष्टीबाबत कुठलाही साक्षीदार नसेल अशी बाब गुन्हा ठरू शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

त्यामुळे ॲट्रॉसिटीच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांना चाप बसणार आहे.

उत्तराखंडमधील या घटनेमध्ये एका महिलेने हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरांमध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्या आधारावर पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात एससी – एसटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता.

त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की ॲट्रॉसिटी कायदा मध्ये सर्व प्रकारचा अपमान आणि धमक्यांचा अंतर्भाव होत नाही तर ज्यामध्ये पीडित व्यक्तीला समाजासमोर अपमान शोषण आणि त्रासाचा सामना अशा घटनांचा या कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित आणि आरोपीं व्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या उपस्थितीत गुन्हा घडणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने याबाबत सांगितले की संबंधित घटनेचे पुरावे पाहिल्यास एससी – एसटी कायदा अधिनियम मधील कलम 3(1 )(आर )नुसार गुन्हा घडलेला नाही.

त्यामुळे या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्यात येत आहे. आरोपी व्यक्ती विरोधात अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करून खटला चालवता येऊ शकतो. तसेच न्यायालयाने यासंदर्भात 2008 मध्ये देण्यात आलेल्या एका अन्य निकालाचा संदर्भ देऊन सांगितले की, सार्वजनिक ठिकाण किंवा असे ठिकाण जिथे लोकांची उपस्थिती असली पाहिजे तर कुठलीही अपमानजनक कृती उघड्यावर होत असेल त्याला अन्य लोक पहात, ऐकत असतील तर एससी – एसटी एक्ट अंतर्गत ही बाब गुन्ह्याच्या श्रेणीत येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!